Sakshi Sunil Jadhav
आजच्या डिजिटल युगात घर, ऑफीस, दुकान किंवा बाजारात गणिताच्या हिशोबासाठी कॅलक्युलेटरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण कॅलक्युलेटरवर असलेल्या काही बटणांचा नेमका अर्थ आजही अनेकांना माहीत नाही.
कॅलक्युलेटरवरच्या CE चा फुल फॉर्म क्लिअर एंट्री ( Clear Entry) असा होतो.
CE बटण फक्त शेवटी टाकलेला चुकीचा आकडा डिलीट करतं. याने पुर्ण गणित डिलीट होत नाही.
जेव्हा मोठं गणित सोडवत असू तेव्हा एखादा आकडा चुकून टाइप झाला असेल, तर CE वापरून चूक सुधारता येते.
AC चा फुल फॉर्म All Clear असा आहे. जो इतका सोपा असून अनेकांना माहित नसतो.
AC बटण कॅलक्युलेटरवरचे सर्व आकडे, गणितं आणि निकाल पूर्णपणे डिलीट करून कॅलक्युलेटर रीसेट करतो.
AC बटण दाबताच स्क्रीनवर 0 दिसतो आणि नवीन गणितासाठी कॅलक्युलेटर वापरता येतं.
CE फक्त शेवटची नोंद काढतो, तर AC संपूर्ण गणित एकदम डिलीट करतो.