Maharashtra Live News Update: शिर्डीत मकर संक्रांतीचा उत्साह, आकर्षक फुलांच्या सजावटीने साई मंदिर सजले

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक १४ जानेवारी २०२६, महापालिका निवडणूक, मकरसंक्रांत, राज्यात थंडी परतली, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Tulajapur: तुळजाभवानी मंदीरात आज सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पुरुषांना प्रवेश बंदी

तुळजापूर -

तुळजाभवानी मंदीरात आज सायंकाळी 5 ते 6 वेळेत पुरुषांना प्रवेश बंदी

मकर संक्रांती निमित्त तुळजाभवानी मातेला ओवसण्यासाठी स्थानिक महीला मंदीरात करतात गर्दी

स्थानिक महीला व सुवासिनींना मंदीरात प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य

मकर संक्रांती निमित्त तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदीर संस्थानचा निर्णय

Nashik: नाशिक पोलिसांकडून शहरात रूट मार्च

नाशिक -

- नाशिक पोलिसांकडून शहरात रूट मार्च

- जुनं नाशिक पंचवटी सिडको परिसरात पोलिसांचा रूट मार्च

- उद्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज असल्याचा संदेश

- कायद्याचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी पोलीस रस्त्यावर

- सायरन वाजवत संवेदनशील भागातून केले संचलन

Nagpur: विदर्भातील चारही महानगर पालिकेत भाजपसह काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

नागपूर -

- विदर्भातील चारही महानगर पालिकेत भाजपसह काँग्रेसची प्रतिष्ठापणाला

- तर दोन्ही सेना, राष्ट्रवादीची अस्तित्वाची असणार लढाई

- नागपूर चंद्रपूर मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस थेट लढत

- अमरावती, अकोला मध्ये चौरंगी लढत असली तर प्रमुख सामना हा भाजप पुढे काँग्रेससाहित अन्य पक्षांचा असणार आहे

- विदर्भातील चारही महानगर पालिका क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह सर्व पक्षीय दिग्गज नेत्यांच्या झाल्या प्रचारसभा

Nagpur: नागपूरमध्ये मनपा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी 'आपली बस' सेवा आज पूर्णपणे बंद राहणार

नागपूर -

- मनपा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी 'आपली बस' सेवा आज पूर्णपणे बंद राहणार

- मनपा निवडणूक कामासाठी 525 आपली बसेसचे व्यवस्था करण्यात आली आहे

- त्यामुळे आज शहर बस सेवा पूर्णपणे बंद राहील तर उद्या मर्यादित मार्गावर 250 बस सुरू राहतील

- 16 जानेवारीपासून शहर बस सेवा आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार पुन्हा सुरू होईल

- निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांपर्यंत नियान करण्यासाठी 525 बस उपलब्ध करून देण्यात आले आहेत

- तसेच अरुंद गल्ली आणि दाट वस्तीतील भागांमध्ये पोहोचण्यासाठी 26 लहान वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे

- शहर बस सेवा आज पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याने याचा परिणाम सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर होण्याची शक्यता

Nashik: नाशिकच्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अटीतटीची लढत

नाशिक -

- महापालिका निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असताना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड

- तर शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजप आमदार मैदानात

- भाजप आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांचं बाईक रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन

- शिंदेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ७ मधील उमेदवार आणि उपनेते अजय बोरस्ते यांना शह देण्यासाठी भाजप आमदार प्रचारात उतरल्या

- प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अटीतटीची लढत

Shirdi: शिर्डीत मकर संक्रांतीचा उत्साह, आकर्षक फुलांच्या सजावटीने साई मंदिर सजले

अहिल्यानगर -

- शिर्डीत मकर संक्रांतीचा उत्साह, आकर्षक फुलांच्या सजावटीने साई मंदिर सजले

- मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वावर आज शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिरात भक्तीचा अनोखा रंग पाहायला मिळत आहे.

- मकर संक्रांत सणानिमित्त नाशिक येथील देणगीदार साईभक्त कैलाश शहा यांच्या देणगीतून साई मंदिर आणि परिसरास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

- या सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज हजारो भाविक शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतील..

Yavatmal: यवतमाळमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात रोही जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

यवतमाळमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात रोही जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

यवतमाळच्या पुसद वनविभागा अंतर्गत येणाऱ्या बोरी ईजारा शेत मशिवारात बिबट्याने रोहीवर हल्ला केल्याने त्यात रोही जखमी झाल्याची घटना उघडकीस आले

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Pune: पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दरोडा प्रकरण, मुंब्रातून एकाला अटक

पुणे -

पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दरोडा प्रकरण

चतुर्श्रुंगी पोलिसांनी मुंब्रातून एकाला केली अटक

खुम्मा दिलबहादुर शाही (वय ४० रा. कौशल मुंब्रा जि.ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे

खुम्मा शाही हे खेडकर यांच्याकडे नुकताच कामाला ठेवलेल्या हिकमती या तरुणाचे वडील आहेत

पूजा खेडकर यांच्या नॅशनल हाऊसिंग सोसायटीतील बंगल्यामध्ये दहा ते पंधरा दिवसांपूर्वी हिकमत हा कामाला लागला होता.

Pune: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात 30 लाख मतदार हक्क गाजवणार

पुणे -

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात 30 लाख मतदार हक्क गाजवणार

३६०५ मतदान केंद्र असणार; २३५४५ अधिकारी व कर्मचारी नियुक्त

पुणे जिल्हा परिषद च्या 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गणासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

जिल्ह्यात 29 लाख 76 हजार 454 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदारांना मतदानासाठी तीन हजार सहाशे पाच मतदान केंद्र असतील तर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 23 हजार 554 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com