Chandrayaan 3 Success Saamtv
देश विदेश

Chandrayaan 3 Success: विक्रम अन् प्रज्ञान... 'चंद्रस्पर्शा'ची खास आठवण; माता- पित्यांनी 'चांद्रयान ३' वरुन ठेवली बाळांची नावे

Baby Name Vikram And Pragyan: कर्नाटकमधील एका दांपत्याने आपल्या मुलांची नावेही चांद्रयान मोहिमेशी संबंधित ठेवून हा क्षण कायमस्वरुपी जतन केला आहे.

Gangappa Pujari

Karnataka News: चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर जगभरातून भारताचं कौतुक होत आहे. संपूर्ण देशभरात या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला जात आहे. शास्त्रज्ञांच्या या कामगिरीचे कौतुक होत असतानाच कर्नाटकमधील एका दांपत्याने आपल्या मुलांची नावेही चांद्रयान मोहिमेशी संबंधित ठेवून हा क्षण कायमस्वरुपी कैद केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्नाटकच्या यादगिरी (Yadgiri) जिल्ह्यातील वडगेरा गावात एकाच कुटुंबात जन्मलेल्या दोन बाळांची नावे 'चांद्रयान 3' (Chandrayaan 3) मोहीमेवरून ठेवण्यात आली आहेत. बाळाप्पा आणि नगम्मा यांना २८ जूनला पुत्ररत्न प्राप्त झाले. या मुलाचे नाव 'विक्रम' असे ठेवण्यात आले. तर निंगाप्पा आणि शिवम्मा यांना २४ ऑगस्टला मुलगा झाला, त्यांच्या बाळाचे नाव प्रज्ञान असे ठेवले.

या दोनही मुलांचा नामकरण सोहळा २४ ऑगस्टला थाटामाटात पार पडला. सध्या या नावांची सर्वत्र चर्चा होत असून पालकांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत बोलताना पालकांनी चांद्रयान ३च्या यशानंतर शास्त्रज्ञांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) गोरखपूरमधील जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या बालकांचीही अशीच नावे ठेवण्यात आली होती. चांद्रयान मोहिम यशस्वी झाल्यानंतर रुग्णालयात सात मुलांचा जन्म झाला. ही आठवण कायमस्वरुपी जतन करुन ठेवण्यासाठी त्यांच्या पालकांनी बाळांची नावेही चांद्रयान मोहिमेवरुन ठेवली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT