Farmer Denied Entry In Mall Due To Wearing Dhoti  Saam Tv
देश विदेश

Karnataka News: धोतर नेसल्याने शेतकऱ्याला मॉलमध्ये नो एन्ट्री, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; मॉलविरोधात सरकारने केली कारवाई

Farmer Denied Entry In Mall Due To Wearing Dhoti : धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश न देणं कर्नाटकमधील एका मॉलला चांगलेच महागात पडले आहे. या मॉलविरोधात सरकारने कारवाई केली आहे.

Priya More

कर्नाटकतल्या बंगळुरूमध्ये धोतर घालून आलेल्या एका वृद्ध व्यक्तीला शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. ही वृद्ध भारतीय पारंपारिक पोशाख असलेले धोतर घालून आला होता. धोतर घालून आल्यामुळे या वृद्धाला मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी गेटवर अडवले आणि आतमध्ये जाऊन दिले नाही. जीटी वर्ल्ड मॉलमध्ये ही घटना घडली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त करत या मॉल विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. या घटनेनंतर कर्नाटक सरकारने बंगळुरूमधील हा शॉपिंग मॉल आठवडाभरासाठी बंद करण्याचे आदेश दिले.

जीटी वर्ल्ड मॉलमध्ये धोतर घातलेल्या वृद्धाला प्रवेश नाकारण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी बुधवारी भारतीय दंड संहिताच्या कलम 126(2) अंतर्गत मॉल मालक आणि सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चित्रपटाचे तिकिटे असूनही वृद्ध शेतकरी फकिरप्पा आणि त्यांच्या मुलाला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. धोतर घातल्यामुळे मगडी मेन रोडवरील मॉलच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी फकिरप्पा यांना अडवले होते. त्यांनी सुरक्षारक्षकांना आतमध्ये सोडण्याची विनंती केली पण त्यांनी ऐकले नाही. या घटनेनंतर फकिरप्पा आणि त्यांच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.

फकिरप्पा हे शेतकरी असून आपल्या मुलाला भेटण्यासाठी कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातून बंगळुरूला आले होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी फकिरप्पा यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारत सांगितले की, मॉलचे धोरण धोतर परिधान केलेल्या व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई करते. मॉलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी फकिरप्पा आणि त्यांच्या मुलाने विनंती केली तरी देखील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही. त्यांनी मॉलमध्ये जाण्यासाठी शेतकऱ्याला धोतर बदलून पँट घालावे असे सांगितले.

आता या मुद्द्यावरून कर्नाटकमधील राजकारण देखील तापले आहे. या घटनेवरून भाजपने काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेस पक्षाला 'शेतकरी विरोधी' म्हटले. भाजप नेत्याने सांगितले की, 'कर्नाटकचे मुख्यमंत्री धोतर घालतात! धोतर हा आमचा अभिमान आहे. शेतकऱ्याने मॉलमध्ये टक्सिडो घातला पाहिजे का? कर्नाटक काँग्रेस याला परवानगी कशी देत ​​आहे.' असा सवाल त्यांनी केला. तसंच, 'ते कट्टर शेतकरी विरोधी आहेत, डिझेलचे दर वाढवून त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. आता धोतर घाललेल्यांना प्रवेश नाकारून शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. राहुल बाबा कुठे आहेत? हा शेतकऱ्याला न्याय आहे का?', असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, मॉलच्या कर्मचाऱ्यांनी शेतकरी फकिरप्पा आणि त्यांच्या मुलाची माफी मागितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: भारताव्यतिरिक्त 'या' देशांमध्येही रुपया चालतो, प्रवास करण्याआधी जाणून घ्या

Big Boss 18: अशनीर ग्रोव्हरची बिग बॅासमध्ये एन्ट्री; सलमान खानने घेतली शाळा,VIDEO व्हायरल

Shahapur Vidhan Sabha : शहापूरमध्ये मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भेटीनंतर बबन हरणेंचा मविआला पाठींबा

Money Astrology: या राशींचे लोक होणार धनवान, रखडलेले पैसेही हातात मिळणार

Jayant Patil: भरणेसारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करा, जयंत पाटील यांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT