Crime News Saam TV
देश विदेश

Crime : क्रूरतेचा कळस! दिल्लीनंतर आता कर्नाटक हादरलं; मुलाकडून वडिलांची हत्या, मृतदेहाचे केले ३२ तुकडे

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी आणखी क्रूर घटना कर्नाटकात घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Karnataka Crime News : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी आणखी क्रूर घटना कर्नाटकात घडली आहे. कर्नाटकातील बागलकोटमध्ये एका व्यक्तीने वडिलांची क्रूर हत्या केली आहे. वडिलांच्या हत्येनंतर व्यक्तीने मृतदेहाचे ३२ तुकडे केले आहे. या घटनेने कर्नाटकात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळाळेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील (Karnataka) बागलकोटमध्ये एका विठ्ठल कुलाली याने वडिलांची हत्या क्रूर हत्या केली आहे. विठ्ठलने वडिलांच्या हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे एका बोरवेलमध्ये फेकून दिले. या प्रकरणात आरोपी विठ्ठल कुलाली याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी विठ्ठलची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी २० वर्षीय विठ्ठल कुलालीने रागाच्या भरात वडिल परशुराम कुलाली (५३) यांची लोखंडी रॉडने हत्या केली. दारुच्या नशेत परशुराम आपल्या दोन मुलांपैकी लहान असलेल्या विठ्ठलल अनेकदा शिवीगाळ करत असे.

गेल्या मंगळवारीही विठ्ठलच्या वडिलांनी शिवीगाळ सुरु केली. यामुळे संतापलेल्या विठ्ठलने लोखंडी रॉडने वडिलांची हत्या केली. हत्येनंतर आरोपी विठ्ठलने परशुराम यांच्या मृतदेहाचे ३२ तुकडे केले. त्यानंतर त्याने हे तुकडे बोअरवेलमध्ये टाकले. या प्रकरणानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

SCROLL FOR NEXT