BENGALURU HYDERABAD CHENNAI BULLET TRAIN PROJECT APPROVED IN KARNATAKA Saam Tv
देश विदेश

बंगळूरू ते हैदराबाद प्रवास फक्त २ तासांत, तर चेन्नईला पोचाल ७५ मिनिटात; हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी

Karnataka Bengaluru Bullet Train Project Update News : कर्नाटक सरकारने बंगळूरू, हैदराबाद आणि चेन्नईला जोडणाऱ्या हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Alisha Khedekar

  • कर्नाटक सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी दिली

  • बंगळूरू, हैदराबाद आणि चेन्नई जोडले जाणार

  • प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार

  • आर्थिक विकास आणि रोजगार संधी वाढणार

  • दक्षिण भारतातील पहिला हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क प्रकल्प

कर्नाटक सरकारने बंगळूरूला हैदराबाद आणि चेन्नईशी जोडणाऱ्या हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. दक्षिण भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचे बुलेट ट्रेन नेटवर्क उभारले जाणार असून, हा प्रकल्प मोठा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे प्रवास जलद होण्याबरोबरच औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या हाय-स्पीड ट्रेनचा वेग ताशी ३२० ते ३५० किलोमीटर इतका असू शकतो. त्यामुळे सध्या ८ ते १२ तास लागणारा हैदराबाद ते बंगळूरू प्रवास अवघ्या २ तास १० मिनिटांत पूर्ण होऊ शकतो.

हा कॉरिडॉर सुमारे ६०७ किलोमीटर लांबीचा असून तो तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांना जोडणार आहे. कर्नाटकातील तुमकूरू, चिक्कबळ्ळापूर आणि बंगळूरू ग्रामीण भागातून हा मार्ग जाणार आहे. तसेच, दुसरा कॉरिडॉर बंगळूरू, म्हैसूर आणि चेन्नईला जोडणार आहे. सध्या बंगळूरू ते चेन्नई प्रवासासाठी ५ ते ७ तास लागतात, मात्र बुलेट ट्रेनमुळे हा वेळ फक्त १ तास १५ मिनिटांपर्यंत कमी होऊ शकतो.

या मार्गावर केजीएफ, व्हाईटफील्ड आणि बैयप्पनहल्ली यांसारखी महत्त्वाची स्थानके असतील. या दोन्ही मार्गांमध्ये कोडिहळ्ळी हे एक महत्त्वाचे इंटरचेंज स्टेशन असणार आहे. येथे मोठे डेपो आणि देखभाल सुविधा उभारण्याची योजना आहे. प्रकल्पासाठी सुमारे १,७५७ हेक्टर जमीन घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या प्रकल्पामुळे तुमकूरू जिल्ह्यालाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सिरा परिसरात स्थानक झाल्यास स्थानिकांना थेट बुलेट ट्रेनची सुविधा मिळेल. तसेच, प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे नोकरी करणाऱ्यांना दररोजचा प्रवास सोपा होईल. एकूणच, या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे दक्षिण भारतातील शहरांमधील अंतर कमी होऊन आर्थिक विकास, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नागरगावात ट्रान्सफॉर्मर जळून खाक; सिंचन व्यवस्था ठप्प, शेतकरी चिंतेत

पुण्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

SCROLL FOR NEXT