BS Yediyurappa  Yandex
देश विदेश

BS Yediyurappa: बीएस येडियुरप्पा यांना अटक होण्याची शक्यता; काय आहे प्रकरण जाणून घ्या

BS Yediyurappa: बेंगळुरू न्यायालयाने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध POCSO प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलाय.

Bharat Jadhav

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. बेंगळुरूच्या एका न्यायालयाने गुरुवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध POCSO प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

विशेष म्हणजे काही तासांपूर्वी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी येडियुरप्पा यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत खटल्याचा तपास केला जाणार आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावलीय. हाती आलेल्या माहितीनुसार, येडियुरप्पा यांना अटकही होऊ शकते.

काय आहे प्रकरण

१७ वर्षीय मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर येडियुरप्पा यांच्याविरुद्धात पॉक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४अ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन फेब्रुवारी रोजी येडियुरप्पा यांनी डॉलर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी एका बैठकीदरम्यान तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने केलाय.

याप्रकरणी सदाशिवनगर पोलीस ठाण्यात १४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्नाटकचे पोलीस महासंचालक आलोक मोहन यांनी तत्काळ पद्धतीने प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश दिलेत. येडियुरप्पा यांच्यावर आरोप करणाऱ्या ५४ वर्षीय महिलेचे गेल्या महिन्यात येथील एका खासगी रुग्णालयात फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. येडियुरप्पा (८१) यांनी आरोप फेटाळून लावले असून, ते कायदेशीररित्या लढणार असल्याचे सांगितले. त्यांनी न्यायालयाला एफआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : ट्रेनमध्ये टॉयलेट असते, पण लोकल आणि मेट्रोमध्ये का नाही? वाचा नेमकं कारण

Salman Khan: कोट्यावधींचा मालक सलमान खान चित्रपटांशिवाय 'या' कामातून करतो बक्कळ कमाई

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

Biscuit Pudding Recipe: न्यू इयरसाठी घरच्या घरी तयार करा टेस्टी बिस्कीट पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana: २ महिने संपले पण खात्यात पैसेच नाहीत, लाडक्या बहि‍णींच्या बँकेत चकरा,₹३००० कधी येणार?

SCROLL FOR NEXT