Karnataka, Koppal , Accident , Birthday
Karnataka, Koppal , Accident , Birthday saam tv
देश विदेश

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच मृत्यूमुखी; चार गंभीर, मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख मदतीची घाेषणा

साम न्यूज नेटवर्क

कर्नाटक : एका भीषण अपघातात (accident) चार महिलांसह (women) एकाच कुटुंबातील (family) पाच सदस्यांचा मृत्यू तर तर चार जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना कर्नाटक राज्यातील काेप्पल जिल्ह्यातील कुकानुरु तालुक्यातील भानपुरा येथे घडली आहे. या घटनेत कारला धडक देऊन घटनास्थळावरून पळून गेलेल्या अन्य वाहन चालकाचा पोलिसांनी शोध घेताहेत. (karnataka latest marathi news)

कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील कुकानुरू तालुक्यातील भानपुरा येथे शनिवारी रात्री हा अपघात झाला. या अपघातात देवप्पा कोप्पाडा (६२), गिरिजम्मा (४५), परव्वा (३२), शांतम्मा (२२) आणि कस्तुरम्मा यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात हर्षवर्धन, पल्लवी, पुट्टाराजू आणि भूमिका हे गंभीर जखमी झाले आहेत. (Koppal Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामधील लाेक एका वाढदिवसाच्या कार्यक्रमास गेलेे हाेते. त्यानंतर पुन्हा गावी जाताना अपघात घडला. पोलिसांनी घटनास्थळावरून कारला धडकलेल्या वाहनाचा मड गार्ड जप्त केला आहे. संबंधित चालकाला पकडण्यासाठी पूरावा गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या भागात सातत्याने टिप्पर लॉरींची ये-जा सुरू असते. या अपघातात टिप्पर लॉरीपैकी एखादे वाहनाने धडक दिली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान धडकेमुळे वाहनाचा पूर्ण चुराडा झाला आहे. त्यामुळे मृतदेह बाहेर काढताना अडचणी निर्माण झाल्यात.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SCROLL FOR NEXT