Karnataka Exit Poll 2023
Karnataka Exit Poll 2023 saam tv
देश विदेश

Karnataka Exit Poll 2023: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातही काँग्रेसचीच मुसंडी! एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठा धक्का

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Karnataka Exit Poll 2023: कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी 10 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आता १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे कर्नाटकात कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. कर्नाटकात बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगर ११३ आहे. हा आकडा कोण गाठणार याचा कल देखील समोर आला आहे.

कर्नाटकातील विधानसभेच्या मदतनानंततर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. यातून यावेळी कर्नाटकात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज येऊ शकतो. समोर आलेल्या ५ पैकी ४ एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनण्याचा अंदाज आहे. तर एका एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात कोणाला किती मतदान?

आजपर्यंतच्या एक्झिट पोलच्या निकालांनुसार महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात काँग्रेसला फायदा होताना दिसत आहे. या सीमाभागातील 50 जागांवरील मदतानात काँग्रेसला 45 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे, तर भाजपला 42 टक्के मते मिळताना दिसत आहेत. याशिवाय जेडीएसला 8 टक्के आणि इतरांना 5 टक्के मदतदान झाल्याचा अंदाज आहे. म्हणजेच सीमाभागातही काँग्रेसने सर्वाधिक मते मिळवली आहेत. (Latest Marathi News)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात कोणाला किती जागा?

या सीमाभात एकूण 50 जागा आहेत. समोर आलेल्या एक्झिट पोलमद्ये यापैकी 21 जागांवर भाजप विजयी होताना दिसत आहे, तर 28 जागांवर काँग्रेस विजयी होईल असा अंदाज आहे. म्हणजेच भाजपला या भागात 9 जागांचं नुकसान होताना दिसत आहे, तर काँग्रसने 11 हून 28 जागांवर मुसंडी मारली आहे. म्हणजेच काँग्रेला 17 जागांचा फायदा होताना दिसत आहे. याशिवाय 1 जागा जेडीएसला मिळताना दिसत आहे.

कर्नाटकात कोणाला किती जागा मिळतील? असे आहेत एक्झिट पोलचे निकाल

Jan Ki Baat Exit Poll : जन की बात एक्झिट पोल

भाजप - ९४ ते ११७ जागा

काँग्रेस - ९१ ते १०६ जागा

जेडीएस - १४ ते २४ जागा

इतर- ० ते २ जागा

Matrize opinion poll: मॅट्रिझे

भाजप - ७९ ते ९४ जागा

काँग्रेस - १०३ ते ११८ जागा

जेडीएस - २५ ते ३३ जागा

इतर - २ ते ५ जागा (Latest Political News)

PMARQ

भाजप - ८५ ते १०० जागा

काँग्रेस - ९४ ते १०८ जागा

जेडीएस - २४ ते ३२ जागा

इतर - २ ते ६ जागा

C Voter Exit Poll in Karnataka 2023 : सी - व्होटर

भाजप - ६६ ते ८६ जागा

काँग्रेस - ८१ ते १०१ जागा

जेडीएस - २० ते २७ जागा

इतर- ० ते ३ जागा

Polstrat Exit Poll in Karnataka 2023 : पोलस्ट्रॅट

भाजप - ८८ ते ९८ जागा

काँग्रेस - ९९ ते १०९ जागा

जेडीएस - २१ ते २६ जागा

इतर - ० ते ४ जागा (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना भर सभेत शरद पवारांनी दम भरला

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

PBKS vs CSK: पंजाबच्या शानदार गोलंदाजीवर जडेजाचा पलटवार! जिंकण्यासाठी ठेवलं १६८ धावांचं आव्हान

Mouni Roy : दिवसाला तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अभिनेत्री 'या' आजाराने होती त्रस्त

Uddhav Thackeray : गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण... ; उद्धव ठाकरे अलिबागमधून भाजपवर कडाडले

SCROLL FOR NEXT