Karnataka Elections Result 2023
Karnataka Elections Result 2023 Saam TV
देश विदेश

Karnataka Elections Result 2023 : कर्नाटकातील विजय काँग्रेससाठी नवसंजीवनी, पण ही लाट थोपवावी लागेल!

Satish Kengar

Karnataka Elections Result 2023 : कर्नाटकमध्ये जवळपास निकाल स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपकडे पाठ फिरवली आहे. तर काँग्रेस हा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये पराभव सहन करत असलेल्या काँग्रेससाठी कर्नाटकचा विजय हा कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा भरणारा ठरणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा हा विजय काँग्रेसला 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीतही फायदा पोहोचवणारा ठरणार आहे, असं काही काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र निवडणुकीचा इतिहास पाहिला तर आपल्याला चित्र जरा वेगळं दिसतं.

2004 Lok Sabha Election : 2004 मध्ये भाजपला ही चूक पडली महागात

वर्ष 2003 मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी केंद्रातही भाजपचं सरकार होतं. विधानसभा निवडणुकीचे परिणाम पाहता भाजपने त्यावेळी वेळेच्या आधी म्हणजे 2004 साली लोकसभा निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

मात्र त्यांचा हा निर्णय फसला आणि भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावेळी भाजपचे मित्र पक्ष तेलुगु देसम पार्टी आणि जनता दल (युनायटेड) यांना एकही जागेवर खंतही उघडता आलं नव्हतं.

ही फक्त 2004 ची गोष्ट नाही. भारतीय मतदारांनी वारंवार दाखवून दिले आहे की विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांसाठी त्यांची पसंती वेगळी आहे. दिल्लीतही आम आदमी पक्षाने 2013 पासून विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र 2014 किंवा 2019 मध्ये लोकसभेतच्या निवडणुकीत आपला यश मिळवता आलं नाही.

यातच कर्नाटकातील भाजपच्या विजयाने 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मदत झाली नाही, ज्याने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचा विजय झाला. हेच चित्र पुन्हा एकदा 2024 मध्येही दिसू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असं असलं तरी कर्नाटकचा हा विजय काँग्रेससाठी 'नवसंजीवनी' ठरणार आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा पाहिला मोठा विजय

वर्ष 2018 मध्ये राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये विजय मिळविल्यानंतर मोठ्या राज्यांच्या विधानसभांमध्ये ठोस विजय मिळवण्यात अपयशी ठरलेल्या पक्षासाठी कर्नाटक हे महत्त्वाचे आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात हा पहिलाच मोठा विजय आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या काँग्रेसला 2024 मध्ये मोठी मदत होऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचं 'पानीपत'; IPLमधील कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

SCROLL FOR NEXT