Karnataka Election Saam Tv
देश विदेश

Karnataka Election : मोठी बातामी! कर्नाटकात 'व्होट फ्रॉम होम' मोहिमेला सुरूवात; निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय

Ruchika Jadhav

Karnataka Elections 2023 : रोजच्या धावपळीच्या जीवनात मतदानाच्या दिवशी नागरिकांना घराबाहे पडून तासंतास रांगेत उभे रहावे लागते. अशात वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांंना काही अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक नागरिकाला आपले मत देता यावे यासाठी आता कर्नाटकात एका अनोख्या मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. कर्नाटकात आता वोट फ्रॉम होमची सुरूवात झाली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत कर्नाटकात शनिवारपासून बॅलेट पेपरने मतदान सुरू होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाचे पाच सदस्यीय पथक तसेच पोलिंग एजंट नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून मते गोळा करणार आहेत. 29 एप्रिल ते 6 मे पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.

80 वर्षांवरील आणि दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या मतदान

निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या या मोहिमेमध्ये ८० वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना आपल्या घरातूनच मतदान करता येणार आहे. मतदान गुप्त पद्धतीने होईल यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी घरोघरी मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात योणार आहेत.

अशी घेताली जाणार खबरदारी

मतदानादरम्यान दोन मतदान अधिकारी, एक सूक्ष्म निरीक्षक, एक व्हिडिओग्राफर आणि पक्ष प्रतिनिधींसह स्थानिक पोलिस उपस्थित राहणार आहेत. मतपत्रिका मतदान यंत्रणा निवडणूक कर्तव्यावर असलेले कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली असेल. मतदान झाल्यानंतर ही मतपेटी स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच १३ मे रोजी मतमोजणी होईल.

मतदार गैरहजर असल्यास?

मतदानाच्या दिवशी दोन वरिष्ठ अधिकारी त्यांच्या घारी जातील. यावेळी होणाऱ्या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात येणार आहेत. जर मतदार घरी उपस्थित नसेल तर अधिकारी काही वेळाने पुन्हा मतदाराच्या घरी जातील. मात्र दुसऱ्यांदा देखील मतदार (Voter) घरी उपस्थित नसेल तर त्याची गैरहजेरी लावली जाईल. तसेच त्याला पुन्हा मतदान केंद्रावर येऊन देखील मतदान करता येणार नाही.

कर्नाटक निवडणूक (Karnataka Elections) आयोगाचे आयुक्त मनोज कुमार मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 99,529 लोकांनी घरून मतदानाचा पर्याय निवडला आहे. यामध्ये 80 वर्षांवरील 80,250 ज्येष्ठ नागरिक आणि 19,729 भिन्न-अपंग मतदारांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT