Gram Panchayat Voting 2022: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरकारची मोठी घोषणा! मतदानासाठी १८ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी

Gram Panchayat Election 2022: निवडणूक आयोगाने ७ हजार ६८२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.
Holiday On Gram Panchayat Election 2022
Holiday On Gram Panchayat Election 2022saam tv

सुशांत सावंत, मुंबई

Gram Panchayat Election 2022: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने ७ हजार ६८२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. राज्यभरातील ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त शासनाकडून मतदारांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदान मोठ्या संख्येने व्हावे हा यामागचा मुख्य हेतू आहे. (Maharashtra News)

Holiday On Gram Panchayat Election 2022
Video: नाद करा, पण रिक्षाचा कुठं? पुण्यात रिक्षेच्या मदतीनं धावली आलिशान मर्सिडीज

लोकशाही भक्कम करण्यासाठी आणि योग्य उमेदवार निवडण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी या ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election 2022) मतदान करावे असं आवाहन निवडणूक आयोगाने केलं आहे. यासाठी १८ डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्या खाजगी आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देणं शक्य नसेल त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना किमान २ तासांची सवलत द्यावी असे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सवलत न देणाऱ्या दुकाने, कार्यालयांवर कारवाई केली जाणार असल्याचही या आदेशात म्हटलं गेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाने हे आदेश जारी केले आहेत. (Latest Marathi News)

पाहा शासनाचा आदेश -

Attachment
PDF
202212151530245510.pdf
Preview

शासनाच्या आदेशात काय म्हटलंय?

1) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

2) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)

3) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.

4) वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com