Karnataka Bengaluru Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : धक्कादायक! पाणीपुरी खायला दिली नाही, गिऱ्हाइकाची सटकली; पाणीपुरीवाल्यासोबत भयंकर घडलं

Karnataka Bengaluru Crime News : बंगळुरूमध्ये फुकट पाणीपुरी न दिल्याने पाणीपुरी ठेला मालकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दुकानदाराचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

  • फुकट पाणीपुरी न दिल्याने दुकानदारावर चाकू हल्ला

  • बंगळुरूमधील बटरायनपुरा परिसरात घटना

  • जखमी दुकानदाराचा रुग्णालयात मृत्यू

  • पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक

पाणीपुरी हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ आहे. या पाणीपुरीसाठी एक नाहक जीव गेला आहे. फुकटात पाणी पुरी न दिल्याने पाणीपुरीचा ठेला चालवणाऱ्या मालकावर थेट चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत दुकानदाराचा मृत्यू झाला असून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. सदर घटना ही कर्नाटकातील बंगळुरूर मध्ये घडली आहे. दरम्यान या हल्ल्याने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १०:०० ते १० :३० च्या सुमारास बेंगळुरूतील बटरायनपुरा मुख्य रस्त्यावर एक पाणी पुरीवाला आपला ठेला घेऊन उभा होता. यादरम्यान त्याच्या ठेल्याजवळ एक दारूच्या नशेत तरुण आला. त्याने पाणी पुरीवाल्याकडे फुकटात पाणीपुरी मागितली. मात्र दुकानदाराने त्याला फुकटात देण्यास मनाई केली. दुकानदाराने विकतची पाणी पुरी खायला सांगितल्याने तरुण संतापला.

या गोष्टीवर आरोपी भडकला आणि दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाला. वादाच्या दरम्यान आरोपीने अचानक चाकू काढला आणि दुकानदाराच्या पोटात चाकूने वार केला. चाकू लागताच दुकानदार तिथेच रक्तबंबाळ होऊन कोसळला, तर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

स्थानिक लोकांनी ताबडतोब जखमी दुकानदाराला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले आणि पोलिसांना माहिती दिली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी दुकानदाराला मृत घोषित केले. या घटनेमुळे रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये आणि स्थानिक लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली. पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपी नशेत होता आणि किरकोळ वादानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलले. आरोपीकडून चौकशी सुरू असून हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election News: दोन मुलांपेक्षा अधिक अपत्य असले तरी निवडणूक लढवता येणार, सरकारची मोठी घोषणा

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना; छगन भुजबळ भडकले, केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली कारवाई मागणी

क्रिकेट खेळताना अचानक जमिनीवर कोसळला; एकुलत्या एक मुलाचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

300 कुटुंब बेघर होणार; 15 दिवसांत घरे खाली करण्याची नोटीस, रहिवाशांमध्ये खळबळ

पोलीस स्टेशनसमोरच दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT