कर्नाटकातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. आपल्या मुलांसमोरच खाजगी बसमध्ये एका आईवर सामूहिक बलात्कार झाला आहे. बस चालक, कंडक्टर आणि हेल्परने चन्नपुरा गावाजवळ महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास करत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्चला पीडित महिला आपल्या २ मुलांसह उच्चंगीदुर्गा मंदिरात गेली होती. दर्शन घेतल्यानंतर महिला आपल्या मुलांसोबत तेथून निघाली. सायंकाळी तेथून निघाल्यानंतर महिलेने दावणगेरे येथे परत येण्यासाठी शेवटची बस पकडली. बसमध्ये तेव्हा ७ ते ८ प्रवासी होते. सर्व प्रवासी उतरले. महिलेचा शेवटचा स्टॉप होता.
नंतर बस चालकाने बस एका निर्जनस्थळी नेली. नंतर मुलांच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबला. तसेच त्यांचे हातही बांधले. नंतर बस चालक, बस कंडक्टर आणि एका व्यक्तीने महिलेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला. मुलांसमोरच नराधमांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केला.
महिलेवर अतिप्रंसग घडत असताना पीडितेने आरडाओरड केला. महिलेचा आवाज ऐकून तेथील शेतकरी धावून आले आणि त्यांनी महिलेला बचावले. तसेच शेतकऱ्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी तपास करत आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींमधून एकावर आधीच ७ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच, एसपी अरासीकेरे यांनी पीडितेचा जबाब नोंदवला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.