KARNATAKA HORROR CRASH: FIVE FAMILY MEMBERS KILLED IN KALABURAGI ACCIDENT Saam Tv
देश विदेश

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, कार आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू

Karnatak Car Accident News : लाडलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तपूर तालुक्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. कार आणि ट्रकच्या समोरासमोर धडकेत ही दुर्घटना घडली असून पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तपूर तालुक्यात भीषण अपघात

  • कार-ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

  • घटना लाडलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली

  • पोलीस तपास सुरू; मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले

कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तपूर तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लाडलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्तपूर तालुक्यातील इंगलागी गावातील हे कुटुंब शुक्रवारी रात्री उशिरा कारमधून यादगीरहून आपल्या गावी परत येत होते. गावातील एका आजारी नातेवाईकाला उपचारासाठी यादगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची विचारपूस करून कुटुंबातील पाच सदस्य परतत असताना हा दुर्दैवी अपघात झाला.

लाडलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकशी कारची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवासी तोलुसाब केशव (२७), हुसेन शाह (४८), मैबूब अली (४५), रसूल बी (४२) आणि फातिमा अली (३८) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह वाहनातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वाडी शासकीय रुग्णालयात पाठवले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. वाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पुण्यातील आयटी इंजिनिअरची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिली कंपनीतील दोन महिलांची नावं, परिसरात खळबळ

Monsoon Update : मान्सून अडखळला! संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान तज्ज्ञांनी दिली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी सुनील भुसारा बिनविरोध

Shocking News: आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू

370 Biryani Controversy: 'व्यक्ती बदलतात, वाद बदलतात, पण प्रेक्षक...'; 370 बिर्याणी वादावर अंकिता वालावलकरनं नेटकऱ्यांना सुनावलं

SCROLL FOR NEXT