India mourns the loss of Kargil war hero Colonel Sonam Wangchuk, remembered for his extraordinary bravery and service. 
देश विदेश

Sonam Wangchuk : कारगिल युद्धाचे महानायक कर्नल सोनम वांगचुक यांचे निधन

Colonel Sonam Wangchuk dead : कारगिल युद्धातील शौर्य गाजवणारे महावीर चक्र विजेते कर्नल सोनम वांगचुक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लडाख स्काऊट्सचे धाडसी कमांडर म्हणून त्यांनी देशासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.

Namdeo Kumbhar

colonel sonam wangchuk passed away : कारगिल युद्धाचे महानायक आणि 'महावीर चक्र' विजेते कर्नल सोनम वांगचुक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय लष्कराचे माजी कमांडर कर्नल वाय. के. जोशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून ही दुःखद माहिती दिली.

"कर्नल सोनम वांगचुक यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत दुःख झाले. आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. या वीर सैनिकाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. कारगिल युद्धातील त्यांचा त्याग, शौर्य आणि निस्वार्थ सेवा देश सदैव लक्षात ठेवेल," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संरक्षण मंत्री आणि भारतीय लष्कराकडून वांगचुक यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुःखाच्या प्रसंगी लष्कर शोकाकुल कुटुंबासोबत खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे. वांगचुक यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. वीर पुत्राला गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

१९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान कर्नल सोनम वांगचुक यांनी आपल्या पराक्रमाने पाकिस्तानच्या सैन्याला धूळ चारली होती. त्यांनी लडाख स्काउट्सच्या चौथ्या बटालियनचे नेतृत्व केले होते. युद्धाच्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत बर्फाच्छादित डोंगररांगांवर धैर्याने शत्रूचा सामना केला. त्यामुळे वांगचुक यांना लडाखमध्ये 'असली शेर' या नावाने ओळखले जाते.

सोनम वांगचुक यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल आणि देशाप्रती असलेल्या समर्पणाबद्दल भारतीय लष्करातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च वीरता पुरस्कार 'महावीर चक्र' देऊन गौरवण्यात आले होते. सोनम वांगचुक यांच्या निधनाने भारतीय लष्कराचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. एका खऱ्या नायकाला, ज्याने आपल्या छातीवर पदके नाही तर देशाचे रक्षण कोरले होते, अवघा भारत देश आज सलाम करत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहे.

कर्नल सोनम वांगचुक यांचा जन्म ११ मे १९६४ रोजी लडाखमधील लेह जिल्ह्यातील शंकर येथे झाला. त्यांचे वडील १४ व्या दलाई लामांचे सुरक्षा अधिकारी होते. सोनम वांगचुक यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवली. त्यानंतर भारतीय सैन्याच्या आसाम रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांनी लडाख स्काऊट्सच्या इंडस विंगमध्ये सेवा बजावली. त्यांना "लडाखचा सिंह" म्हणून ओळखले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT