Protesters gather near US Embassy in Karachi as tensions escalate; US Marines open fire on crowd. Saam Tv
देश विदेश

खामेनेईच्या समर्थनार्थ आंदोलन करणे पडले महागात, अमेरिकेच्या सैन्याने झाडल्या छाती आणि तोंडावर गोळ्या, 22 जणांचा मृत्यू

Karachi Protest Against Khamenei Assassination: खामेनेईच्या हत्येच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात अमेरिकन मरीन गार्डने गोळीबार केला. या हिंसक घटनेत २२ नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले.

Omkar Sonawane

इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेईच्या हत्येनंतर पाकिस्तानच्या कराचीमध्ये अमेरिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर निदर्शने करणे तेथील नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे. अमेरिकेच्या जवानांनी थेट या आंदोलकांवर गोळीबार केला. पाकिस्तानमधील सिंध सरकारच्या प्रवक्त्याने हा खुलासा केला. या गोळीबारात किमान २२ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारने मौन बाळगले आहे, असे म्हटले जात आहे की पाकिस्तान सरकार या विषयावर बोलून अमेरिकेसोबत संबंध खराब करू इच्छित नाही.

पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानमधील सिंध सरकारचे प्रवक्ते सुखदेव हेमनानी म्हणाले, काही लोकांनी कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाजवळ निदर्शने केली. यादरम्यान अमेरिकन मरीन गार्डच्या कर्मचाऱ्यांनी गोळीबार केला, ज्यामध्ये २२ लोकांचा मृत्यू झाला. किमान ३४ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या मते, पाकिस्तानी नागरिकांची चूक होती.

छातीत आणि चेहऱ्यावर झाडल्या गोळ्या

पाकिस्तानच्या ब्रीफ मासिकाने याबद्दल वृत्त दिले. त्यात म्हटले आहे की अमेरिकन मरीन गार्ड सैनिकांनी निदर्शकांवर छातीत आणि चेहऱ्यावर गोळ्या झाडल्या. २०११ नंतर पहिल्यांदाच अमेरिकन सैन्याने पाकिस्तानींवर गोळीबार केला आहे. अमेरिकन दूतावासाने या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. त्याऐवजी, त्यांनी व्हिसा सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनातही अमेरिकन सैन्याबाबत कोणतीही टिप्पणी केलेली नाही. कराची हे एक बंदर शहर आहे आणि अमेरिकेने तेथे वाणिज्य दूतावासाच्या सुरक्षेसाठी मरीन गार्ड्स तैनात केले आहेत.

पाकिस्तानमध्ये ३ कोटी शिया समाज

पाकिस्तानमधील शिया समुदायाची लोकसंख्या 3.7 कोटी इतकी आहे, जी एकूण लोकसंख्येच्या अंदाजे १५ टक्के आहे. पाकिस्तानची एकूण लोकसंख्या २४ कोटी आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खामेनी यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला, परंतु त्यांनी अमेरिकेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इराण हा पाकिस्तानचा शेजारचा देश आहे. या दोघांमध्ये फक्त 909 किलोमीटरची सीमा आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताचा बहुतांश भाग इराणला लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train: पुणेकरांसाठी गुड न्यूज! १९ तासांचा प्रवास फक्त १३ तासांवर; पुणे-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस धावणार

CMRF Maharashtra: मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मोठा डिजिटल बदल; रुग्णांना ८ तासांत मदतीचा निर्णय

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या शिरला

Face Care: सॉफ्ट ग्लोईंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी संध्याकाळी १० मिनिटांसाठी लावा ही घरगुती पेस्ट

विकासाच्या वेगात पर्यावरणाचा बळी? राज्यातील आणखी एका जिल्ह्यात १०० वर्षे जुन्या झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT