Karachi building collapse update  Saam tv
देश विदेश

Karachi building collapse : पाकिस्तानात चमत्कार! इमारत कोसळून हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू, पण 'ती' आश्चर्यकारकरित्या बचावली

Karachi building collapse update : पाकिस्तानात इमारत कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला. त्यात २० हिंदूंचा समावेश आहे. या दुर्घटनतून एक चिमुकली आश्चर्यकारकरित्या बचावली.

Vishal Gangurde

पाकिस्तानात इमारत कोसळल्यानंतरही एक चमत्कार घडला. कराचीत पाच मजली इमारत कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एका हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू झाला आहे. याच कुटुंबातील एक ३ महिन्याची चिमुकली आश्चर्यकारकरित्या बचावली. गुजरातच्या अहमदाबादानंतर आता पाकिस्तानातही चमत्कार घडल्याचे दिसून आले आहे.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला होता. अपघातग्रस्त विमानातील एक प्रवासी सोडून सर्वच प्रवाशांचा कोळसा झाला होता. विमानातील १२ क्रू मेंबरचाही मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावल्याने जगभर चर्चा झाली होती. त्यानंतर आता पाकिस्तानच्या कराचीत घडलेल्या अपघातात एका चिमुकलीचा आश्चर्यकारकरित्या जीव वाचला आहे.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, इमारत दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू झाला. २० जण एकमेकांचे नातेवाईक होते. या भीषण दुर्घटनेतूनही तीन महिन्यांची चिमकुली आश्चर्यरिकरित्या बचावली.

बचाव करणाऱ्या पथकातील एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, 'आम्हाला ढिगाऱ्याखाली एक जिवंत मुलगी आढळली. परंतु चिमुकलीची आई आणि कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांची शोधाशोध करताना चिमुकलीच्या शरीरावर किरकोळ जखम झाल्याने नाकातून रक्त येत होतं. त्या व्यतिरिक्त चिमुकलीच्या शरीरावर कोणतेही जखमा नव्हत्या.

'चिमुकली जिथे सापडली, त्याजवळच आईचा मृतदेह आढळला. ढिगाऱ्याखालून आईचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हिंदू कुटुंबातील इतर सदस्यांचाही मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत, असेही कर्मचारी मजहर यांनी सांगितलं.

'इमारत कोसळल्यानंतर ढिगारा अंगावर पडू लागला, त्यावेळी आईने मुलीला दूर फेकलं असेल. त्यामुळे चिमुकलीचा जीव वाचला असेल, असेही मजहर यांनी सांगितलं.

दरम्यान, तेथील सरकारचा दावा आहे की, परिसरातील २२ इमारती जीर्ण झाल्या होत्या. त्यातील १४ इमारती रिकाम्या केल्या होत्या. कोसळलेली इमारत देखील जीर्ण झाली होती. इमारत कमकुवत झाल्याने ५ मजली इमारत कोसळल्याचा दावा स्थानिक प्रशासाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT