Kanpur Building Fire  Saam Tv
देश विदेश

Kanpur Fire: कानपूरमध्ये अग्नितांडव! इमारतीला भीषण आग, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Kanpur Building Fire: कानपूरमध्ये रविवारी रात्री इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. शॉर्टसक्रिटमुळे इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली.

Priya More

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. कानपूरच्या चमनगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ५ मजली इमारतीला अचानक भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या ५० पेक्षा जास्त गाड्यांच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या चमनगंज परिसरातील गांधीनगरमध्ये असणाऱ्या पाच मजली इमारतीला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण इमारतीला आगीने वेढा घातला. या इमारतीमध्ये अनेक जण अडकले होते. त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. आई-वडील आणि ३ मुलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ८ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या आगीमध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आग विझवण्यासाठी ८ तास लागले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली. या इमारतीच्या तळमजल्यावर चप्पल बनवण्याचा कारखाना होता आणि वरच्या मजल्यावर अनेक कुटुंब राहत होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि संपूर्ण इमारत जळून खाक झाली. आग लागलेल्या इमारतीच्या दोन्ही बाजूला ५०० मीटर अंतरापर्यंत सर्व रस्ते ब्लॉक करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT