crime  x
देश विदेश

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

Uttar pradesh Crime News : महिलेने बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

कानपूरमध्ये आईने बॉयफ्रेंडसाठी पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

आरोपी महिलेने मुलाच्या नावाने ४० लाख रुपयांचे विमे काढले

पोलिस तपासात प्रेमसंबंध आणि विमा रक्कम यामागचा कट उघड

पोलिसांकडून आरोपी आई आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक

कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित महिलेने बॉयफ्रेंडसाठी पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमात अडथळा ठरल्याने आईने एकुलत्या एक मुलाला संपवल्याचे पोलिस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे.

आरोपी महिलेने मुलाच्या हत्येआधी ४० लाख रुपयांचे ४ विमा काढले होते. या विम्याच्या पैशांतून चांगली रक्कम महिलेला हवी होती. मात्र, पोलिसांनी आरोपींच्या षडयंत्रावर पाणी फेरलं. दोघांनी मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

नेमकं काय घडलं?

आरोपी ममता हिचा पती संदिप कुमार यांचं निधन झाल्यानंतर तिची जवळीक मयंक याच्याशी वाढली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ममताचा मुलगा प्रदिप हा आंध्र प्रदेशमध्ये नोकरी करत होता. तो दिवाळीनिमित्त गावी आला होता. प्रदिपला गावातील लोकांकडून आईचे प्रेमसंबंध कळलं. मयंकने दोघांच्या प्रेमसंबंधाचा विरोध केला. त्यामुळे दोघांनी प्रदिपला संपवण्याचा कट रचला. त्यासाठी दोघांनी त्याचा ४० लाखांचा विमा काढला. हत्या करण्यासाठी बाजारातून हत्यार देखील खरेदी केले.

मयंकचा आणि त्याचा लहान भाऊ ऋषिने २६ ऑक्टोबर रोजी प्रदिपला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला. त्यानंतर गाडी रस्त्यात थांबवून प्रदिपच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. त्यानंतर रत्याच्या बाजूला फेकून दिलं.

घटना कुठे घडली?

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे ही धक्कादायक घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?

आयोगाविरोधात विरोधकांची वज्रमूठ, ठाकरे-पवारांचा एकीचा नारा

Raj Thackeray Exposes 4500 Fake Voters: व्होट चोरीचे 4500 पुरावे, राज ठाकरेंनी मोर्चात आणले पुराव्यांचे गठ्ठे

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रातील अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येणार

Mumbai Local Train Update: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द, वर्ल्डकपशी कनेक्शन

SCROLL FOR NEXT