German Shepherd dog kept by woman kills owner  Saam TV News
देश विदेश

कुत्रा पाळताय ...सावधान! पाळीव कुत्राच ठरला भक्षक, तोडले मालकीणीचेच लचके

German Shepherd Dog Killed Owner : कोणत्याही कुटुंबात जेव्हा कुत्रा पाळला जातो तेव्हा कुटुंबिय त्याला प्राण्यासारखं नाही तर आपल्या मुलांप्रमाणेच वाढवतात. मात्र याच कुत्र्याने त्याच्या मालकाचाच जीव घेतलाय.

Tejal Nagre

तेजल नागरे, साम टीव्ही

कानपूर : अनेक जणांना घरी कुत्रा पाळण्याची हौस असते. अनेकांच्या घरी पाळलेलेही असतील. मात्र हाच जीव लावलेला कुत्रा जेव्हा मालकाच्याच जीवावर उठला तर, अशीच एक धक्कादायक घटना घडलीये कानपूरमध्ये. पाहूयात याचसंदर्भातला रिपोर्ट.

कोणत्याही कुटुंबात जेव्हा कुत्रा पाळला जातो तेव्हा कुटुंबिय त्याला प्राण्यासारखं नाही तर आपल्या मुलांप्रमाणेच वाढवतात. मात्र हाच कुत्रा जेव्हा त्याच्या मालकाच्याच जीवावर उठतो तेव्हा. उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये असाच एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय.

मोहिनी त्रिवेदी ही महिला आपल्या कुटुंबियांसोबत कानपूरमध्ये राहायची. तिच्या नातवानं एक जर्मन शेफर्ड पाळला. सर्वांनी अगदी मुलासारखा त्याचा सांभाळ केला. १४ मार्चला मोहिनी अंगणात गेल्या असता कुत्रा भुंकायला लागला..सुरुवातीला घरच्यांना वाटले बाहेरच्या माणसावर कुत्रा भुंकत असेल. पण जेव्हा कुटुंबिय बाहेर आले तेव्हा त्यांना दिसलं हृदयाचा थरकाप उडवून देणारं चित्र.

केलेले उपकार कधीही न विसरणारा, मालकाची अगदी इमानदार असणारा अशी कुत्र्याची ओळख..त्यामुळे तुम्हीही घरी कुत्रा पाळत असाल तर त्यापासून आपल्याला आणि कुटुंबातील लहान मुलं, वृद्ध आणि परिसरातही कुणालाही उपद्रव होणार नाही याची काळजी नक्की घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

SCROLL FOR NEXT