नवी दिल्ली : तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात बुधवारी (8 नोव्हेंबर) एक अत्यंत दुर्दैवी अशी दुर्घटना घडली. येथे लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं (Bipin Rawat Helicopter Crash). या दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झालाय. त्यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. याच हेलिकॉप्टरमध्ये ओदिशा येथील हवाई दलातील जुनिअर वॉरंट अधिकारी राणा प्रताप (Rana Pratap) देखील होते. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. (JWO Rana Pratap Died In Coonoor Helicopter Crash along with General Bipin Rawat)
अधिकाऱ्याच्या मृत्यूने कृष्णाचंद्रपूर गावात हळहळ
हवाई दलातील जुनिअर वॉरंट अधिकारी राणा प्रताप हे फक्त 35 वर्षांचे होते. ते ओदिशाच्या कृष्णाचंद्रपूर गावातील होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कृष्णाचंद्रपूर गावावर शोककळा पसरली आहे. ते 2006 मध्ये हवाई दलात रुजू झाले होते.
पत्नी आणि मुलाशी अखेरची भेट
त्यांची अखेरची पोस्टिंग ही कोयंबतूर येथे झाली होती. नोव्हेंबरमध्ये त्यांची ट्रेनिंग असल्याने त्यांनी पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलाला सासरी पाठवलं. त्यांनी कधी विचारही केला नसेल की ही त्यांची अखेरची भेट असेल.
कुन्नूरमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये राणा प्रताप यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या आई-वडिलांची प्रकृती ठीक नसते. त्यामुळे त्यांना गुरुवारी उशिरा या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेने प्रताप कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
"जानेवारीत दोन महिन्याच्या सुट्टीवर येतो सांगितलं"
राणा प्रताप यांची मोठी बहीण सुश्री यांनी टेलीग्रामला दिलेल्या माहितीनुसार, "जेव्हा मला माझ्या एकुलत्या एक भावाच्या निधनाची माहिती मिळाली तेव्हा माझं जग उध्वस्त झाल्यासारखं वाटलं. आम्ही अत्यंत वाईट काळातून जात आहोत. राणाशी माझं चार दिवसांपूर्वीच फोनवरुन बोलणं झालं होतं. त्याने जानेवारीमध्ये दोन महिन्यांच्या सुट्टीवर गावी येण्याचं वचन दिलं होतं. त्यांना यायला आता फक्त एक महिना उरला होता. अखेरची त्यांच्याशी आमची भेट ही नवरात्रीत झाली होती."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.