JP Nadda  Saam Tv
देश विदेश

BJP New President: जेपी नड्डा यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश, कोण होणार नवीन भाजप अध्यक्ष? विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा

Modi government 3.0: जेपी नड्डा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामील झाले आहेत. रविवारी नड्डा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. यातच आता भाजपला आता नव्या पक्षाध्यक्षाची गरज भासणार आहे.

Satish Kengar

चार वर्षांहून अधिक काळ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेतृत्व केल्यानंतर जेपी नड्डा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामील झाले आहेत. रविवारी नड्डा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याकडे कोणते मंत्रिपद सोपवले जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

9 नोव्हेंबर 2014 ते 30 मे 2019 या काळात मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून काम केले होते. यातच आता भाजप नवीन पक्षाध्यक्षाची निवड करणार आहे. भाजप पक्ष 'एक व्यक्ती, एक पद' हे धोरण अवलंबतो. याअंतर्गत पक्षाला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे.

नड्डा यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. धर्मेंद्र प्रधान ओडिशाच्या संबलपूर मतदारसंघातून 1,19,836 मतांनी विजयी होऊन लोकसभेत पोहोचले आहेत आणि त्यांना मोदी मंत्रिमंडळातही स्थान मिळाले आहे.

याशिवाय भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ज्या नेत्याचे नाव चर्चेत आहे ते म्हणजे भूपेंद्र यादव. राजस्थानच्या अलवर मतदारसंघातून 48,282 मतांनी विजयी होऊन ते लोकसभेत पोहोचले असून त्यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात स्थानही देण्यात आले आहे.

विनोद तावडेंचे नावही चर्चेत

या नावांमध्ये पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. तावडे सध्या बिहारचे प्रभारी आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते डॉ. दिनेश शर्मा यांचेही नाव चर्चेत आहे. शर्मा हे राज्यसभेचे खासदार असून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. ते यूपीचे माजी उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Maharashtra Live News Update : मुंबईमध्ये आलिशान कारला भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

SCROLL FOR NEXT