पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी (AAP) पक्षाने घवघवीत यश मिळवलं आहे. आप आता पंजामध्ये सत्ता स्थापन करणार आहे. पंजाबमधील 'आप' नवे मुख्यमंत्री आता भगवंत मान (Bhagwant-mann) हे असणार आहेत. एक कॉमेडियन म्हणून आपला प्रवास सुरू करणाऱ्या मान यांनी राजकारणात मोठी मजल मारली आहे. ते आता लवकरच पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एक कॉमेडियन ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास मोठा आहे.
भगवंत मान (Bhagwant-mann) यांचा जन्म 17 ऑक्टोंबर 1973 रोजी पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातील सतोज गावात जाट शीख कुटुंबात झाला. त्यांनी सुनम येथील शहीद उधम सिंग शासकीय महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे.
राजकारणात येण्यापूर्वी भगवंत मान (Bhagwant-mann) हे क़ॉमेडियन म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी अनेक स्टेज शो केलेतं. भगवंत मान हे 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या प्रसिद्ध शोमधून प्रसिध्द झाले.
मान यांनी राजकारणातील कारर्कीद ही 2011 मध्ये सुरु केली. पीपल्स पार्टी ऑफ पंजाब (Punjab) सोबत काम करत होते. मान यांना एकदा निवडणुकीत हार मानावी लागली होती. ती निवडणूक म्हणजे 2012 ची लेहरा विधानसभा मतदार संघातून ते लढले होते. पुढ ते 2014 मध्ये अरविंद केजरीवाल यांना भेटले आणि ते आम आदमी पक्षात सामिल झाले.
2018 मध्ये त्यांनी आप ला राजीनामा दिली होता पण पुन्हा ते आप मध्ये सामिल झाले. ते 2017 मध्ये आपमधून लढून निवडून आले आहेत.
पंजाब (Punjab) आप चे भगवंत मान (Bhagwant mann) हे आता मुख्य चेहरा बनले आहेत. आता लवकरच पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. कॉमेडियन ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास अविस्मरणीय आहे.
Edited by- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.