Joshimath Isro Satellite Saamtv
देश विदेश

Joshimath Sinking Live Updates : इस्त्रोचे धोकादायक संकेत! संपूर्ण पवित्र जोशीमठ शहरंच उध्वस्त होणार?

ISRO report on Joshimath: हे जोशीमठ धसण्याच्या प्रक्रियेवर इस्त्रोने धोकादायक इशारा दिला आहे.

Gangappa Pujari

Joshimath Sinking News: हिमालयाचं प्रवेशद्वार संबोधल्या जाणाऱ्या आणि हिंदू धर्मात पवित्र स्थान असलेल्या जोशी मठाची. चमोली जिल्ह्यात आदि शंकराचार्य स्थापीत केलेलं हे तिर्थस्थळ. मात्र, इथं जमीन धसण्याचं प्रमाण वाढल्यानं अनेक लोक घर सोडून जात आहेत. आता हे जोशीमठ धसण्याच्या प्रक्रियेवर इस्त्रोने धोकादायक इशारा दिला आहे.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने जोशीमठ शहराच्या उपग्रहातील फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंवरुन जोशीमठ जमीनीत बुडण्याची प्रक्रिया कशी संथगतीने सुरू आहे, तसेच जोशीमठ अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेंटीमीटरपर्यंत बुडाल्याचे सॅटेलाइट इमेजमधून दिसून आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इस्रोने अंतराळातून जोशीमठाचे फोटो प्रसिद्ध केले आहेत आणि याद्वारे , 27 डिसेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान 5.4 सेमी भूस्खलनाची नोंद झाली आहे. एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान, जोशीमठमध्ये 9 सेंटीमीटरची संथ घट झाली. एनएसआरसीने गेल्या आठवड्यात सांगितले की डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यादरम्यान वेगाने घट सुरू झाली आहे. असा इशारा दिला आहे.

चमोली जिल्हा प्रशासनाने जोशीमठ हे भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गेल्या काही दिवसांत शेकडो घरे आणि इमारतींना तडे गेले आहेत. जोशीमठमधून शेकडो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारने 1.5 लाख रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले असून पुनर्वसन करण्याचे काम सध्या सुरू आहे.

भूस्खलनाला जबाबदार कोण?

जोशीमठमधील भूस्खलनाचे विश्लेषण करण्यासाठी अनेक तज्ञ पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र, स्थानिक लोकांनी एनटीपीसी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे, एनटीपीसीने एक निवेदन जारी करून दावा केला आहे की त्यांचा बोगदा जोशीमठच्या खाली जात नाही. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

Maharashtra Live News Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT