Senior Assam Congress leader Jonson J. Sangma has resigned from the party after nearly 25 years of association, triggering political speculation in the state. Saam Tv
देश विदेश

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा; राजकारणात खळबळ

Jonson J Sangma Resignation From Congress After 25 Years: आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ नेते जॉनसन जे. संगमा यांनी जवळपास २५ वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Omkar Sonawane

ऐन निवडणुकीच्या तोंडावर आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे (APCC) वरिष्ठ नेते Jonson J. Sangma यांनी पक्षातील सर्व पदांवरून आणि प्राथमिक सदस्यत्वावरून राजीनामा दिला आहे. जवळपास २५ वर्षे चाललेला त्यांचा काँग्रेसमधील राजकीय प्रवास आता संपुष्टात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. १२ मार्च रोजी APCC अध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात संगमा म्हणाले, मला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे तसेच पक्ष नेतृत्व आणि सहकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांत दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभार व्यक्त करतो.

Senior Assam Congress leader Jonson J. Sangma has resigned from the party after nearly 25 years of association, triggering political speculation in the state.

संगमा यांनी २००१ साली Indian National Congress मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर दोन दशकांहून अधिक काळ ते पक्षाच्या विविध संघटनात्मक कामांमध्ये सक्रिय होते. या काळात त्यांनी आसाममधील पक्ष संघटनेत अनेक महत्त्वाची पदे सांभाळली.

अलीकडेच ते Assam Pradesh Congress Committee चे सचिव म्हणून कार्यरत होते. त्याआधी २०२१ ते २०२६ या कालावधीत त्यांनी APCC च्या अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. या काळात त्यांनी संघटनात्मक कामे तसेच जनसंपर्क उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. पक्षातील कार्यकाळात राज्यभरातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे संगमा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या काळात मिळालेले अनुभव आणि शिकवण पुढील आयुष्यात कायम उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

पक्षातील भूमिकांव्यतिरिक्त त्यांना सार्वजनिक प्रशासनाचाही अनुभव आहे. २००६ ते २०१० या काळात त्यांनी Rabha Hasong Autonomous Council चे कार्यकारी सदस्य म्हणून काम केले होते. त्या काळात त्यांनी राभा हसोंग परिसरातील स्थानिक विकास आणि समाजाशी निगडित विषयांवर काम केले. दरम्यान, अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे आसामच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan: युद्धामुळे कंगाल पाकिस्तानची आर्थिक कोंडी, फेडावं लागणार अब्जावधी डॉलर्सचं कर्ज

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

SCROLL FOR NEXT