new government regulations, bars in five-star hotels may be allowed to remain open until 4 am.  
देश विदेश

आता रात्रभर चालणार बार; 5-स्टार हॉटेलबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

State Government Preparing New Liquor Policy : राज्यातील बार, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लब १ एप्रिलपासून या नियमावलीअंतर्गत सुरू होतील. त्यापूर्वी, मंत्रिमंडळाच्या मंजुरीसह सर्व प्रक्रियांचे पालन केले जाईल.

Bharat Jadhav

  • राज्य सरकार बार आणि हॉटेल्ससाठी नवीन दारू विक्री नियमावली आणणार.

  • पंचतारांकित हॉटेलमधील बार पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळू शकते.

  • बार, रेस्टॉरंट, क्लब आणि हॉटेल्ससाठी समान नियम लागू होणार.

बार आणि रेस्टॉरंट्समधील दारू विक्रीसाठी राज्य सरकार नवीन नियमावली तयार करणार आहे. या नव्या नियमानुसार पंचतारांकित हॉटेलमध्ये पहाटे चार वाजेपर्यंत दारू मिळणार आहे. झारखंड एक्साईज हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि क्लब (परवाना आणि ऑपरेशन) नियम २०२६ लवकरच सुधारणांसह मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे.

झारखंड उत्पादन शुल्क विभाग बार नियम २०२६ वर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा आढावा घेतला जातोय. दरम्यान नियमांचा आणि आक्षेपाचा रिव्ह्यू घेतल्यानंतर सुधारित नियम लवकरच मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवले जाणार आहेत. घेण्यात आलेले आक्षेप आणि नियमांचा आढावा घेतल्यानंतर ते १ एप्रिल रोजीपासून लागू होण्याची अपेक्षा आहे.

१ एप्रिलपासून राज्यातील बार, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लब या नियमावली अंतर्गत सुरू होतील. त्याआधी मंत्रिमंडळाच्या मंजुरीसह सर्व प्रक्रियांचे पालन केले जाईल. ७ फेब्रुवारी शनिवारी उत्पादन शुल्क आणि दारूबंदी विभागाने सामान्य जनता, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट चालकांसाठी या नवीन नियमनाचा मसुदा जारी केला होता.

त्यानंतर नियमांवर हरकती मागवण्यात आल्या होत्या. या नियमनाबद्दल बार ऑपरेटर आणि इतर व्यवसायांकडूनही आक्षेप घेण्यात आले होते, त्या सर्व आक्षेपांचा आता आढावा घेतला जातोय. आक्षेपांचा आढावा घेतल्यानंतर, सुधारित नियम लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवले जातील.

नवीन नियम काय आहेत?

राज्यातील बार, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि क्लबसाठीच्या नियमांनुसार, पंचतारांकित हॉटेल्सना पहाटे ४ वाजेपर्यंत दारू देण्याची परवानगी मिळेल.

वेगवेगळ्या जिल्ह्यांनी बार ऑपरेशन्ससाठी वेगवेगळे वेळा, वेगवेगळे शुल्क इत्यादी निश्चित केले आहेत. उत्पादन शुल्क विभागाने प्रस्तावित नियमांच्या मसुद्यावर आक्षेप नोंदवण्याची शेवटची संधी २० फेब्रुवारीपर्यंत दिली होती.

सुरक्षा ठेवी आणि परवाना शुल्कात वाढ करण्यास व्यवसायांनी आक्षेप घेतला आहे. प्रस्तावित नियमांमध्ये व्हॅटचा समावेश करणे अन्याय्य असल्याचे असोसिएशनने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT