Jharkhand Ramleela News Saam TV
देश विदेश

Jharkhand Ramleela News: दुर्दैवी! रामलीलामध्ये भगवान परशुरामाची भूमिका साकारताना मृत्यूने कवटाळलं; कलाकाराच्या निधनाने परिसरात हळहळ

Artist Dies On Stage: आपल्या अभिनयात ते फार पारंगत होते. त्यांचा अशा पद्धतीने मृत्यू होईल याची कुणालाच काही कल्पना नव्हती.

Ruchika Jadhav

Ramlila Actor Dies:

मृत्यू कधी आणि कसा ओढावेल हे आजच्या युगात सांगणे कठीण आहे. झारखंडमधील गढवा जिल्ह्यात रामलीलामध्ये एका कलाकाराचा अभिनय करतानाच मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बुधवारी ही घटना घडलीये. दुर्गापूजेनिमित्त येथे रामलीलेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या १० वर्षांपाासून विनोद प्रजापती यामध्ये भगवान परशुरामाची भूमिका साकारत होते. आपल्या अभिनयात ते फार पारंगत होते. त्यांचा अशा पद्धतीने मृत्यू होईल याची कुणालाच काही कल्पना नव्हती.

अभिनय करतानाच मृत्यू

विनोद परशुराम देवाची भूमिका साकारत होते त्यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागले. ते अचानक खाली पडले. विनोद खाली पडले तेव्हा हा त्यांच्या अभिनयातीलच एक भाग असावा असं त्यांच्या सहकलाकारांना वाटलं. काही वेळ विनोद तसेच पडून राहिले. सहकलाकारांनी त्यांना आवाजही दिला. मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे विनोद यांच्या जवळ गेले असता ते बेशुद्ध असल्याचे समजले.

सहकलाकारंनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. विनोद यांचा मृत्यू झालाय हे प्रेक्षकांनाही माहिती नव्हते. आता आपल्यासमोर इतका चांगला अभिनय करणारा व्यक्ती या जगात नाही हे समजल्यावर सर्वच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला.

विनोद यांच्या आकस्कित निधनाने संपूर्ण झारखंडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे सहकलाकार आणि प्रेक्षकांसह सर्वजण त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Aamir Khan : बॉलिवूडमध्ये खळबळ! आमिर खानच्या घरी एकाचवेळी २५ आयपीएस अधिकारी धडकले, नेमकं प्रकरण काय?

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT