Jharkhand Nurse Wife Saam TV
देश विदेश

Jharkhand Nurse Wife: पत्नीच्या शिक्षणासाठी कर्जबाजारी झाला; नर्स होताच गेली दुसऱ्यासोबत पळून

Nurse Wife Marries Boyfriend: प्रियाने पतीची फसवणूक केली. ती दिलखुष राऊत नावाच्या प्रियकरासोबत पळून केली.

साम टिव्ही ब्युरो

Jharkhand Godda News:

झारखंडमध्ये पत्नी यशाच्या शिखरावर पोहचल्यावर आपल्या पतीला सोडून गेली आहे. पतीला कर्ज काढण्यास सांगून शिक्षण पूर्ण केल्यावर ही महिला प्रियकरासोबत पळून गेली. पतीने पोलिसांत धाव घेतली असून पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

नर्स झालेल्या महिलेचे नाव प्रिया कुमारी आहे. प्रियाच्या पतीने तीच्या शिक्षणासाठी कर्ज काढलं होतं. कर्ज काढून तिला नर्सिंगचं शिक्षण दिलं. पण प्रियाने पतीची फसवणूक केली. ती दिलखुष राऊत नावाच्या प्रियकरासोबत पळून केली. ज्योती मौर्या प्रकरणासारखीच ही घटना गोड्डा जिल्ह्यात घडलीये.

पतीला पाठवले दुसऱ्या लग्नाचे फोटो

ही महिला एवढ्यावरच थांबली नाही. तिने प्रियकराशी पळून जाऊन लग्न केलं. लग्नाचे फोटो तिने पतीला आणि कुटुंबीयांना पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच पतीने पोलिसांकडे धाव घेतली, तसेच न्यायाची मागणी केलीय. याशिवाय संतप्त झालेल्या पतीने फसवणूक करणाऱ्या पत्नीकडे शिक्षणावर खर्च केलेले लाखो रूपये परत करण्याची मागणी केली आहे.

२०२० मध्ये झालं लग्न

टिंकू कुमार असं पतीचं नाव आहे. त्याने २०२० साली प्रियासोबत लग्न केलं. तिला शिकण्याची आवड होती. तिची आवड लक्षात घेत टिंकूने तिला नर्सिंग कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन दिलं. यासाठी त्याने अडीच लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. १९ सप्टेंबर रोजी ती घरातून पळून गेली. त्यानंतर दिल्लीत जाऊन तिने लग्न केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT