Hemant Soren Wife Kalpana Soren Saam Tv
देश विदेश

Jharkhand Elections 2024: हेमंत सोरेन यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, JMM ने कल्पना सोरेन यांना दिली उमेदवारी

Gandey Assembly Election: झारखंड मुक्ती मोर्चाने (JMM) त्यांना गांडेय विधानसभा मतदार संघाच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आहे. झारखंडमधील या जागेसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे.

Priya More

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren) या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाने (JMM) त्यांना गांडेय विधानसभा मतदार संघाच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आहे. झारखंडमधील या जागेसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाने (JMM) गुरुवारी सांगितले की, तुरुंगात असलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन गांडेय विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. गिरिडीह जिल्ह्यातील ही जागा झामुमोचे आमदार सरफराज अहमद यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली आहे. या जागेवर येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या गृहिणी आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता एम.टेक आणि एमबीए आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथे त्यांनी शालेय शिक्षण घेतले आणि भुवनेश्वरमधील विविध संस्थांमधून अभियांत्रिकी आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.

कल्पना सोरेन यांचा राजकीय प्रवास 4 मार्च रोजी गिरिडीह जिल्ह्यात जेएमएमच्या 51 व्या स्थापना दिन सोहळ्याने सुरू झाला. याठिकाणी त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले होते. यामध्ये त्यांनी दावा केला की, 2019 मध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांनी एक कट रचला होता. झारखंड त्यांच्या पतीला तुरुंगात टाकणाऱ्या शक्तींना चोख प्रत्युत्तर देईल.

यानंतर रांची येथील इंडिया आघाडीच्या मेळाव्यातही त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. कल्पना यांनी आरोप केला होता की, 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माझे पती हेमंत सोरेन यांना निवडणुकीपूर्वी त्यांच्या सरकारविरोधात कट रचणाऱ्या शक्तींनी तुरुंगात टाकले होते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT