Jharkhand Election Saam tv
देश विदेश

Jharkhand Election : झारखंड विधानसभा निवडणुकीत ८१ जागांपैकी ९ जागा ठरणार गेमचेंजर; काय आहे नेमकं राजकीय समीकरण?

Jharkhand Election News : झारखंड विधानसभा निवडणुकीत ८१ जागांपैकी ९ जागा गेमचेंजर ठरणार आहेत. जाणून घ्या या मतदारसंघातील राजकीय समीकरण

Vishal Gangurde

मुंबई : हरियाणात विधानसभा निवडणुकीत भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आली. हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचं लक्ष आता झारखंड विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. हरियाणा मध्ये ९० विधानसभा होत्या. तर झारखंडमध्ये ८१ विधानसभा मतदारसंघ आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीतील काही जागांवर घासून लढाई होणार आहे. झारखंडमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ४१ आकडा मॅजिक फिगर आहे. या झारखंडमध्ये कमीत कमी ९ विधानसभा मतदारसंघ गेम चेंजर असणार आहेत.

झारखंडमध्ये देवघर, गोड्डा, कोडरमा, मांडू, बाघमारा, जरमुंडी, सिमडेगा, नाला आणि जामा हे ९ विधानसभा मतदारसंघ गेम चेंजर ठरणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. तर जेएमएम-काँग्रेसने प्रत्येकी दोन-दोन जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून या ९ मतदारसंघातील ८ जागांवर भाजप-आजसू पक्षांची युती आघाडीवर होती.

सिमडेगा विधानसभा मतदारसंघात २८५ मतांच्या फरकाने काँग्रेसने भाजपला पराभूत केलं होतं. तर बाघमारा विधानसभा मतदारसंघात भाजपने काँग्रेसच्या उमेदवाराचा ८२४ मतांनी पराभव केला होता. तर ९ पैकी चार जागांवर भाजप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. तर तीन जागांवर आरजेडी दुसऱ्या क्रमांकावर होता. काँग्रेस आणि आजसू एक-एक जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होता.

१९ विधानसभा मतदारसंघात विजयामध्ये ५ हजारांचा फरक

२०१४ साली झालेल्या निवडणुकीत १९ मतदारसंघातील विजयाचं मार्जिन ५००० मतांनी कमी होते. २०१९ साली झालेल्या १९ जागांपैकी १४ विधानसभा मतदारसंघात निकाल बदल्याचे दिसून आले. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत १९ जागांवर विजयाची सरासरी मते २१०० होती. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत ७ जागा जिंकल्या होत्या. तर २ जागांवर आजसू पक्षाने बाजी मारली होती. जेएमएम, काँग्रेस, मार्क्सवादी को-ऑर्डिनेश कमिटी, जेवीएम आणि नवजवान संघर्ष मोर्चाने २०१४ साली झालेल्या निवडणुकीत एक-एक जागांवर मजल मारली होती.

२०१९ साली झालेल्या निवडणुकीत १४ जागांवरील निकाल बदलल्याचे दिसून आले. त्यातील जेएमएम पक्षाने पाच तर काँग्रेसने ३ जागांवर बाजी मारली होती. त्यानंतर काँग्रेस आणि जेएमएम पक्षाने सरकारची स्थापना केली होती. त्यावेळी भाजपने त्यातील ५ जागा जिंकल्या होत्या. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत जे उमेदवार २०१४ साली ठराविक १९ जागांवर दुसऱ्या क्रमाकांवर होते. ते उमेदवार २०१९ साली झालेल्या निवडणुकीत जिंकले होते. मात्र, त्यांचा विजय फार कमी मतांनी झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्रह्म मुहूर्तावर 'या' शब्दांचा जप करणं आहे शुभं, वर्षभर घरी येईल पैसा

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

SCROLL FOR NEXT