Jhansi Hospital Fire Jhansi Hospital Fire
देश विदेश

Jhansi Hospital Fire : झाशीमध्ये हाहा:कार! रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

fire at Jhansi hospital : उत्तर प्रदेशमध्ये १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झालाय. योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेत.

Namdeo Kumbhar

10 children killed, 16 injured in fire at Jhansi hospital : उत्तर प्रदेशमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. रुग्णालयात 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झालाय. झांशीमधील महारानी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये ही दुर्देवी घटना घडली. ३७ नवजात बाळांना खिडकी तोडून वाचवण्यात आले. या दुर्देवी घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी रात्री लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये नवजात शिशु विभागाला (NICU) भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. तर १६ बालकं गंभीर जखमी झाले आहेत. ३७ बालकांना खिडकीच्या काचा तोडून वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याचं समोर आलेय. आगीची घटना घडताच रुग्णालयात गोंधाळाची स्थिती निर्माण झाली. कुटुंबीय आणि रुग्ण जीव वाचवण्यासाठी धावत होते, त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढले. आगाची घटना घडली त्यावेळी रुग्णालयाच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये 54 नवजात बालकं होती.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती झाशीचे जिल्हा अधिकारी अविनाश कुमार यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला, त्याशिवाय सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये नवजात शिशु विभागाला शुक्रवारी मध्यरात्र साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग धुमसण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता आगीनं इतकं भीषण स्वरुप धारण केलं की, यामध्ये 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसुद्धा या घटनेमध्ये स्वत: लक्ष घालत असून, त्यांनी तातडीनं तपासयंत्रणा कामाला लावत 12 तासांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik To Akkalkot: गुड न्यूज! ६ राज्यांमधून जाणार महामार्ग, नाशिक ते अक्कलकोट ४ तासांत पोहचता येणार; ही शहरं येणार जवळ

Akkalkuwa News : प्रसूतीसाठी झोळीत टाकून पायपीट; रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचणे अशक्य, माघारी फिरत घरीच प्रसूती

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT