JDU MLC Dinesh Kumar Singh Latest Update News SAAM TV
देश विदेश

आमदाराकडं विमानतळावर सापडलं मोठं घबाड; नोटा मोजण्यासाठी मागवलं मशीन

जेडीयू आमदार दिनेश कुमार सिंह हे विमानतळावर उतरताच ईडी आणि आयकर विभागानं ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

Nandkumar Joshi

JDU MLC Dinesh Kumar Singh Detained | पाटणा: दिल्लीहून विमानानं बिहारची राजधानी पाटणाला परतणारे जेडीयू आमदार दिनेश कुमार सिंह यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. दिनेश सिंह यांना ताब्यात घेऊन विमानतळावरील व्हीआयपी लाउंजमध्ये चौकशी करण्यात येत आहे.

आयकर विभाग आणि ईडीचे पथक दिनेश कुमार सिंह यांची चौकशी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेडीयूचे (JDU) आमदार दिनेश सिंह यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली आहे. त्यांची पत्नी बीना देवी या लोजप (पारस गट)च्या खासदार आहेत.

दिनेश सिंह हे दिल्लीहून (Delhi) विमानाने पाटणा येथे आले होते. पाटणा विमानतळावर (Airport) ते बाहेर पडत असताना त्यांना आयकर विभाग (Income Tax) आणि ईडीने (ED) ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. दोन्ही तपास यंत्रणांची पथके त्यांची चौकशी करत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिनेश सिंह यांच्याकडे मोठी रक्कम आढळून आली आहे. त्यामुळे नोटांची बंडले मोजण्यासाठी आयकर विभागाच्या पथकाने मशीन मागवली आहे. दिनेश सिंह यांच्याकडे नेमकी किती रक्कम सापडली आहे, याबद्दल अद्याप अधिक माहिती मिळू शकली नाही. दिनेश सिंह इतकी मोठी रक्कम घेऊन का येत होते, याची चौकशी पथक करत आहे.

आमदार दिनेश सिंह हे उपचारांसाठी दिल्लीच्या रुग्णालयात गेले होते, अशी माहिती मिळत आहे. बरेच दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर १९ सप्टेंबरला रुग्णालयातून त्यांना सोडण्यात आले होते. रुग्णालयातून सोडल्यानंतर मंगळवारी, २० सप्टेंबर रोजी ते पाटण्याला परतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : मी आपल्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलोय; उद्धव ठाकरेंची जनतेला भावनिक आवाहन | Marathi News

Sanjay Raut : शेकाप ही भाजपची 'बी' टीम; संजय राऊत यांची शेकाप उमेदवार टीका

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT