Japan Sea Moved Back Saam Digital
देश विदेश

Japan Sea Moved Back: बापरे! जपानमधील भूकंपानंतर चक्क समुद्र सरकला ८२० फूट मागे

Japan Sea Moved Back: जपानमध्ये भूकंपानंतर समुद्रच मागे हटल्याचं समोर आलं आहे. तब्बल ८०० फूटांपेक्षा जास्त समुद्र मागे सरकला आहे. सॅटलाईट छायाचित्रांमध्ये किनारपट्टी पहिल्या पेक्षा अधिक मोकळी झाल्याच स्पष्ट दिसत आहे.

Sandeep Gawade

Japan Sea Moved Back

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये भयंकर भूकंप आला होता. ७.६ रिश्टर स्केलच्या या भूकंपाने जपानचं अतोनात नुकसान झालं आहे. शेकडो लोकांच्या मृत्यू झाला होता. भूकंपानंतर किनारपट्टीवरील लोकांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान या भूकंपानंतर समुद्रच मागे हटल्याचं समोर आलं आहे. तब्बल ८०० फूटांपेक्षा जास्त समुद्र मागे सरकला आहे. सॅटलाईट छायाचित्रांमध्ये किनारपट्टी पहिल्या पेक्षा अधिक मोकळी झाल्याच स्पष्ट दिसत आहे.

भूकंपामुळे अनेक किनारे कोरडे पडले असून बोटींना किनाऱ्यावर पोहोचणं कठीण झालं आहे. भूकंप आणि त्सुनामीनंतर नोटो बेटांवर हे भूवैज्ञानिक बदल दिसून आले आहेत. ही एक धोकादायक स्थिती असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. नाहेल बेलघेर्ज यांनी आपल्या एक्स ट्विटर हॅन्डलवर याचे फोटो शेअर केले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सॅटलाईट फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे की ज्या ठिकाणी पूर्वी समुद्राचं पाणी होतं तो भाग आता कोरडा पडला आहे. सुमारे ८२० फूट समुद्राचं पाणी मागे सरकलं आहे, दोन फूटबॉल मैदानाच्या आकाराइतका भाग कोरडा पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT