जपानमध्ये (Japan) नेहमीच भूकंपाचे हादरे जाणवत असतात. आज देखील जपानमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. हा भूकंप तब्बल ७.४ रिश्टर स्केलचा होता. भूकंपानंतर समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरांना त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. भूकंपाच्या रिश्टर स्केलचे प्रमाण जास्त असल्याने यात नागरिकांच्या घरांचे तसेच अन्य मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकसान झालेल्या ठिकानचे काही व्हिडीओ देखील समोर आलेत. नोटो द्वीपकल्पात शेजारील शहरांत भूकंप झाल्यानंतर असलेल्या परिस्थितीचा व्हिडीओ तेथील स्थानीकांनी सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड झाल्याचे दिसत आहे.
भूकंपामुळे येथील अनेक इमारतींना तढे गेलेत. यातील सुपरस्टोअरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दुकानातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय.
७.४ रिश्टर स्केलचा भूकंप असल्याने परिसरातील अनेक रस्त्यांना मोठ मोठ्या भेगा पडल्यात आणि तडे गेलेत. काही ट्वीटर अकाउंटवर स्टेशन परिसरातील घटनेचे व्हिडीओ देखील टाकण्यात आलेत.
जपानमधील एका ऑफिसमध्ये भूकंपाचे झटके जाणवल्यावर आलेल्या परिस्थितीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. येथे एका ऑफिसमध्ये भूकंपाचे झटके जाणवताच नागरिकांना पळापळ सुरू केली. आपला जीव वाचवण्यासाठी अनेक जण ऑफिसच्या टेबलखाली लपण्याचा प्रयत्न करताना दिसले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.