जपानमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवांवर ताण वाढला आहे. संसर्गजन्य रोगामुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आठवडाभरात 4 हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यानं जपान सरकारने फ्लूची साथ पसरल्याची अधिकृत घोषणा केलीये. आरोग्य विभागाने लोकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्यानुसार 20 वर्षांत हवामान अचानक बदलण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे लोक बाधित झाले आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते फ्लूचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा अधिक गंभीर आणि धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहे. 135 हून अधिक शाळा आणि डेकेअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. देशभरातील जवळजवळ 3 हजार रुग्णालयांमध्ये फ्लूने ग्रस्त रुग्ण आहेत. ओकिनावा, टोकियो आणि कागोशिमा प्रांतात रुग्णांची संख्या जास्त आहे. मास्क घालणे, हात धुणे आणि स्वच्छता राखण्याचं आवाहन केले आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
जपानमध्ये फ्लूचा हंगाम साधारणपणे डिसेंबर ते मार्च पर्यंत असतो. मात्र यंदा त्याची सुरुवात लवकर झाली आहे. इतकच नाहीतर आरोग्य तज्ञांच्या मते इन्फ्लूएंजाचा विषाणू अभूतपूर्व वेगाने स्वतःला बदलत आहे. ही समस्या फक्त जपानपुरती मर्यादित नाही. त्यामुळे पर्यटकांना अधिक सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. संक्रमित लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्यांच्यासोबत विषाणू घेऊन जात आहेत. त्यामुळे इतर देशांमध्येही या फ्लूचा प्रादुर्भाव होण्याची भिती आहे. कोरोनाच्या कटू आठवणी पाहता या विषाणूवर संशोधनाची गरज व्यक्त होत आहे. जपानमधील आरोग्य स्थितीवर स्ध्या अनेक देशांचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.