Saam TV News
देश विदेश

Japan Airlines : उड्डाण घेताच विमानात बिघाड, १० मिनिटांत २६००० फूट खाली आले, १९१ प्रवाशांचा जीव टांगणीला

Boeing 737 technical fault : शांघायहून टोकियोला जाणाऱ्या बोईंग ७३७ विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते २६००० फूट खाली आलं. १९१ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला, पण मोठा अपघात टळला.

Namdeo Kumbhar

Boeing 737 technical fault leads to mid-air emergency for 191 passengers : अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आणखी एक विमान दुर्घटना होता होता थोडक्यात वाचलेय. चीनमधील शांघाय विमानतळावरून जपानच्या टोक्योला जाणाऱ्या बोईंग ७३७ या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला अन् १९१ जणांचा जीव टांगणीला गेला. कारण, शांघाय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर १० मिनिंटातच विमान तब्बल २६००० फुटावरून वेगात खाली आले, विमानातील १९१ जणांना आपला हा प्रवास अखेरचा असल्याचा भास काही क्षणापुरता झाला. सर्वांनी अखेरचा मेसेज लिहिण्यासाठी घेतला होता. पण पायलटच्या प्रसंगावधान अन् हुशारीमुळे मोठी दुर्घटना टळली. विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले.

विमानात होते १९१ प्रवासी -

दक्षिण चीनमधील मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, शांघायमध्ये लँड झालेल्या बोईंग ७३७ विमानात १९१ प्रवासी होते. पायलट आणि क्रू मेंबर्ससह विमानात २०० जण होते. विमानात सर्वाधिक लोक ये चीनमधील होते, ते सर्वजण टोक्योला निघालेले होते.

जपानमधील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बोईंग विमानाच्या केबिनमध्ये टेक्निकल फॉल्ट आला होता. हा तांत्रिक बिघाड क्रू मेंबर्सकडून दुरूस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी विमान अतिशय वेगाने १० मिनिटांत २६००० फूट उंचावरून खाली आले.

विमानाच्या केबिनमधील हवेचा दाब नियंत्रित ठेवणाऱ्या प्रेशरायझेशन सिस्टममध्ये बिघाड झाला होता. त्यावेळी तेव्हा वैमानिकांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संपर्क साधला होता, असे आधीच्या काही रिपोर्ट्समधून समोर आले होत.

एयर होस्टेसच्या वॉर्निंगमुळे गोंधळ उडाला

२६००० फूटांवरून विमान खाली येत असतानाच एयर होस्टेस सावधानतेचा इशारा दिला. हा इशारा ऐकताच विमानात एकच गोंधळ उडाला. लोक ओरडू लागले, किंचाळू लागले. काहींनी लगेच सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली, तर काहींनी आपली अंतिम इच्छा लिहायला सुरू केली.

सुदैवाने विमान अपघाताची दुर्घटना टळली अन् ते व्यवस्थित लँड झाले. विमान उतरल्यानंतर ते सुमारे एक तास तसेच ठेवण्यात आले. त्यानंतरच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जपान एअरलाइन्सने सांगितले की, त्यांनी सर्व प्रवाशांना प्रत्येकी १०,००० रुपयांची नुकसानभरपाई देण्याची ऑफर दिली आहे. एअरलाइन्सने याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT