Jammu Kashmir: एकाच वेळी तीन ठिकाणी दिसली संशयास्पद ड्रोन्स! Saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir: एकाच वेळी तीन ठिकाणी दिसली संशयास्पद ड्रोन्स!

गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यत वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन्स उडताना दिसून आले आहेत.

वृत्तसंस्था

जम्मू काश्मीर : देशाच्या जम्मू-काश्मीर Jammu Kashmir भागात संक्षयास्पद ड्रोन्स आढळून येण्याच्या घटना सुरु आहेत. काल ता. २९ रोजी गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यत वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन्स उडताना दिसून आले आहेत.

या घटनेबद्दल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठ ते साडेऊनच्या वाजण्याच्या सुमारास चिलाद्या, बारी-ब्राह्मणा आणि गगवाल या परिसरांमध्ये एकाच वेळी हे ड्रोन्स दिसले आहे. यापैकी दोन ड्रोन्स लष्करी छावणीजवळ दिसले होते. तर एक ड्रोन इंडियो तिबेटीयन पोलीस म्हणजेच आयटीबीपीच्या ITBP छावणीजवळ दिसून आले. सुरक्षादलाच्या जवानांनी BSF या ड्रोन्सवर गोळीबार केल्यानंतर हे ड्रोन्स Drones या ठिकाणाहून निघून गेले.

काही दिवसांपूर्वी असेच पाकिस्तानी ड्रोन भारतीय सैन्याने सीमेवर पाडले होते. त्या घटनेनंतर आता पुन्हा संशयास्पद ड्रोन दिसून आले त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणखी अलर्ट झाल्या आहेत. ड्रोन दिसल्यावर बीएसएफ BSF जवानांनी ड्रोन वर गोळीबार Firing केला आणि त्यानंतर ते गायब झाले. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांकडून आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन Search Operation सुद्धा करण्यात आले.

दरम्यान, याआधी सापडलेले पाकिस्तानी ड्रोन कनचक परिसरामध्ये पोलिसांनी पाडले होते. त्यानंतर हे ड्रोन स्फोट घडवून आणणारे पाच किलो आयईडी सामान घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT