Political tensions rise in Jammu and Kashmir after BJP leaders questioned the stability of the National Conference-led government. saam tv
देश विदेश

आणखी एका राज्यातील सरकार कोसळणार; भाजप नेत्याच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Jammu kashmir Politics : नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर असल्याचा दावा भाजप नेते सुनील शर्मा यांनी केलाय. जम्मू-काश्मीरमध्ये नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे. या विधानांमुळे संपूर्ण प्रदेशात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय.

Bharat Jadhav

  • जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स सरकार अस्थिर असल्याचा दावा

  • नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार पक्ष सोडू शकतात, असे वक्तव्य त्यांनी केले.

  • भाजप सरकार पाडण्यासाठी कोणताही प्रयत्न करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम बंगालनंतर आणखी एका राज्यातील सरकार कोसळणार असल्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यातील राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी होत होत आहेत. यासर्व राजकीय घडामोडीमुळे देशाच्या राजकारणात मोठा परिणाम होतोय. आता हाती आलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालनंतर जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच सरकारमध्ये आलबेल असून ते कधीही कोसळू शकते, असा दावा भाजपकडून केला जातोय.

जम्मू-काश्मीरमधील भाजपचे विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी हा दावा केलाय की, नॅशनल कॉन्फरन्सचे सर्व आमदार फ्री फुकट विकले जाण्यास तयार आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुनील शर्मा म्हणाले की, भाजप स्वतःचे सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याच प्रकारे जम्मू-काश्मीरमधील विद्यमान सरकारला अस्थिर करणार नाही.

भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री उमर अब्दुला यांच्याविरोधात एक मोर्चा काढणार आहे. त्या रॅलीआधी सुनील शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार कोणत्याही किमतीमध्ये विकण्यास तयार आहेत. परंतु आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेणार नाहीत.

पक्षात फूट पाडणार नाही- सुनील शर्मा

सुनील शर्मा यांनी स्पष्ट केलं की, विद्यमान सरकार पाडून किंवा पक्षात फूट पाडून त्यांना सरकार स्थापन करण्याची इच्छा नाहीये. कारण समोरचा पक्ष आधीच फुटलेला आहे. त्यांच्यात दुफळी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याची त्यांना काय गरज? तिथे सर्व काही त्यांच्याच नियंत्रणाखाली तर चालले आहे." सरकार स्थापन न करताच सर्व काही घडत असल्याचं सुनील शर्मा म्हणालेत.

जम्मू-काश्मीरमध्ये ३७०कलम पुन्हा लागू होणार नाही. ही गोष्ट सरकारनं स्वीकारली आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा दिला जाईल आणि सरकारने ते मान्य केलंय. आम्ही म्हटलं होतं की कलम ३५-ए संपुष्टात आणले जाईल आणि खरोखरच ते हटवण्यात आले. आम्ही जाहीर केले होतं की, जमात-ए-इस्लामीपासून ते हुरियतपर्यंतचे सर्वजण देशविरोधी आहेत. त्यांच्यावर बंदी घातली जाईल असं आम्ही म्हणालो होतो, त्याप्रमाणे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.

सुनील शर्मा पुढे म्हणाले की, राज्यात कोणीच येथे राजकीयदृष्ट्या कैद नाहीत. जे कैदेत आहेत, ते देशद्रोही आहेत, ही बाब सरकारनं मान्य केलीय. त्यामुळे आम्हाला सरकार बनवण्याची गरज नाहीये. न सरकार न स्थापन करता ही कामे होत आहेत. जर ही कामे करण्यात आम्हाला अडचणी आल्या असत्या तर आम्ही सरकार बनवण्यासाठी प्रयत्न केला असता. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सरकार स्थापन करेल तेव्हा पुर्ण बहुमतानेच सराकर स्थापन करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Honey Benefits: दररोज 1 ग्लास दूधात मध मिसळून पिण्याचे 7 फायदे; तिसरा फायदा वाचून थक्क व्हाल

Snake Facts : सापांना कान नाहीत, मग ते आवाज कसे ऐकतात? ९९ टक्के लोकांना याबद्दल माहिती नाही

Kidney Health: किडनी खराब होऊ नये म्हणून जीवनशैलीत आजच करा हे 7 महत्त्वाचे बदल

पावसाळ्यात खा गावरान स्टाईल दिंड्याची भाजी; घरी बनवण्याची रेसिपी एकदम सोपी

Koel Mallick Resign : ३ महिन्यांपूर्वीच शपथ, आता राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका

SCROLL FOR NEXT