राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Analog Paneer Banned in Maharashtra Over Health Concerns: तुम्हीही आवडीनं पनीर खाताय..तर ही बातमी तुमच्यासाठी आहे... राज्यात आता अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आलीय. नेमकं अ‍ॅनालॉग पनीर हा काय प्रकार आहे? हे पनीर नेमकं कसं बनवलं जातं? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट....
MAHARASHTRA BANS ANALOG PANEER | KNOW DIFFERENCE BETWEEN REAL AND FAKE PANEER
MAHARASHTRA BANS ANALOG PANEER | KNOW DIFFERENCE BETWEEN REAL AND FAKE PANEERsaam tv
Published On

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दुधाच्या पनीरऐवजी अॅनालॉग पनीर म्हणजेच कृत्रीम पनीरची सर्रास विक्री केली जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएनं थेट या पनीरवर बंदी घातलीय. ‘एनालॉग पनीर’चं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री यांवर एक वर्षासाठी बंदी घालण्याचा आदेश एफडीएनं दिलाय. भाजप आमदार विक्रम पाचपुतेंनी मार्च 2025 मध्ये कृत्रीम पनीरचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. त्यामुळे आता त्यावर अंमलबजावणी करण्यात आलीय.

महत्त्वाचं म्हणजे, ‘एनालॉग पनीर’ कसं ओळखायचं? असं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. साधं पनीर आणि ‘एनालॉग पनीर’ यात नेमका फरक काय? तेही पाहूयात...

कसं ओळखाल अस्सल पनीर?

घटक

अस्सल पनीर - शुद्ध दूध आणि लिंबू

अॅनालॉग पनीर - पाम ऑईल, स्किम मिल्क पावडर, स्टार्च

किंमत

अस्सल पनीर - दुधाच्या किमतीनुसार तुलेनेनं महाग

अॅनालॉग पनीर - स्वस्त घटकांपासून बनवल्यानं पनीर स्वस्त

चव

अस्सल पनीर - मऊ आणि खाताना विरघळणारं

अॅनालॉग पनीर - चवीला रबरासारखं

पौष्टिक मूल्य

अस्सल पनीर - उच्च प्रथिनं, कॅल्शियम आणि निरोगी स्निग्ध पदार्थ

अॅनालॉग पनीर - प्रथिनांचं प्रमाण कमी, ट्रान्स फॅट्स केमिकल्स

आरोग्यावर परिणाम

अस्सल पनीर - पौष्टिक आणि फायदेशीर

अॅनालॉग पनीर - चरबी वाढणं, कोलेस्ट्रॉलचा आजार

वापर कुठे?

अस्सल पनीर - घरगुती जेवण आणि दर्जेदार हॉटेल्समध्ये

अॅनालॉग पनीर - स्ट्रीट फूड आणि कॅटरर्समध्ये

एव्हंढच नाहीतर, एफडीएच्या कारवाईनंतर कृत्रिम पनीर आणि दुधापासून बनवलेले पनीर यामधील फरक कसा ओळखायचा, हे जाणून घेण्यासाठी साम टिव्हीनं थेट हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरंतर, एनालॉग पनीर दिसायला अगदी अस्सल पनीरसारखचं असल्यानं अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत 'एनालॉग पनीर'वर प्रशासनानं घातलेली बंदी नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र, या आदेशाची केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्षात अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. अन्यथा जनतेच्या आरोग्यशी खेळ सुरूच राहणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com