Jammu Kashmir Saam Tv
देश विदेश

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कराची मोठी कारवाई; २ दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण

कुलगामच्या हदीगाम भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.

साम वृत्तसंथा

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबत लष्कराची (Army) चकमक सुरू झाली आहे. घटनास्थळी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असून, संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. कुलगामच्या हदीगाम भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. लष्करांनी शोधमोहीम दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. (Jammu Kashmir)

या चकमकी दरम्यान दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती मिळत आहे.

दहशतवादी आणि लष्करांमध्ये (Army) गोळीबार सुरू आहे. दहशतवादी पळून जाऊ नये यासाठी लष्करांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र त्यांच्याकडून आणखी गुपिते उघड होतील म्हणून लष्कर त्यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या महिन्यात २९ जून रोजी कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यावेळी अमरनाथ यात्रेच्या मार्गापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर लष्कराची दहशतवाद्यांशी चकमक झाली होती.

गेल्या काही दिवसांत लष्कराने अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीरच्या खोऱ्यात पुन्हा पंडीतांना लक्ष करण्यात येत आहे. तेव्हापासून लष्करही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Bangles Design: श्रावणात महिलांनी हातात घाला हिरव्या बांगड्या, सौंदर्य येईल खुलून

Nirmala Nawale: कारेगावच्या सरपंचबाईंनी केली पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा; PHOTO पाहा

Dharashiv : शेतात काम करताना अनर्थ घडला; तीन चिमुकल्या झाल्या पोरक्या, गावाने उचलली मुलींची जबाबदारी

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Rajgira Paratha Recipe : श्रावणात उपवासाला करा झटपट राजगिऱ्याचे पराठे, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT