Bagu Khan Jammu Kashmir Terrorist x
देश विदेश

Terrorist Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश, चकमकीत दहशतवादी बागू खान उर्फ ​​ह्यूमन जीपीएस ठार

Jammu Kashmir Terrorist : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचे मोठे ऑपरेशन यशस्वी झाले. या ऑपरेशनमध्ये दहशतवादी बागू खान उर्फ समंदर चाचा उर्फ ह्यूमन जीपीएस मारला गेला आहे.

Yash Shirke

  • जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्काराचे मोठे ऑपरेशन यशस्वी झाले.

  • भारतीय लष्कराने दहशतवादी बागू खान उर्फ ह्यूमन जीपीएसला ठार झाला.

  • चकमकीत बागू खानसह आणखी एक दहशतवादी मारला गेला.

Bagu Khan Jammu Kashmir Terrorist : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश प्राप्त झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्यो मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बागू खान उर्फ समंदर चाचा हा सुरक्षा दलांच्या चकमकीत मारला गेला. हा दहशतवादी १९५५ पासून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये राहत होते. दहशतवादी टोळ्यांमध्ये बागू खानला ह्यूमन जीपीएस असे म्हटले जात असे.

मागील तीन वर्षांमध्ये बागू खान उर्फ समंदर चाचा यांनी गुरेझ सेक्टरच्या विविध भागांमधून १०० हून अधिक घुसखोरीच्या प्रकरणात मदत केली होती. या भागातील गुप्त मार्गांची आणि प्रतिकूल परिस्थितीची त्याला पूर्ण माहिती होती. यामुळे तो सर्व दहशतवादी गटांसाठी खास बनला होता. यामुळे त्याला ह्युमन जीपीएस असे नाव पडले होते.

ज्या वेळेस तो हिजबुल कमांडर होता, त्या वेळेस त्याने गुरेझ आणि एलओसी रेषेवरील शेजारच्या भागातून घुसखोरीचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात दहशतवादी संघटनेला मदत केली होती. बांदीपोरामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना भारतीय लष्कराने दहशतवादी बागू खानला ठार मारले. या चकमकीत आणखी एक दहशतवादी मारला गेला. यामुळे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे.

गुरुवारी (२८ ऑगस्ट) जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये एलओसीवर बागू खानने घुसखोरीचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन सुरु केले. चकमक सुरु असताना बागू खानसह आणखी एक दहशतवादी सुरक्षा दलांनी मारला. दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ ऑगस्टच्या सकाळी परिसरात गोळीबार आणि शोध मोहीम सुरु होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : नाद करा, पण आमचा कुठं! भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय; अभिषेक- गिलने धू धू धुतलं

Laxman Hake: आरक्षणाचा वाद वाढणार; SC मधून 'या' समाजालाही आरक्षण द्या; लक्ष्मण हाकेंची नवी मागणी

India vs Pakistan: फक्त एका चेंडूनंतर थांबवण्यात आला होता सामना; कारण आलं समोर

Sahibzada Farhan Gun Celebration: वाह दुबे जी वा! स्लोअर बॉलवर ढेर अन् म्हणे 'गन' सेलिब्रेशन|Video Viral

Bhadrapad Pola : बैलाची पूजा नव्हे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव; पुण्यात भाद्रपद पोळा उत्साहात साजरा, VIDEO

SCROLL FOR NEXT