Jammu Kashmir Baisran Another suspect arrested Saam Tv News
देश विदेश

Pahalgam Baisaran : मोठी बातमी! पहलगाममध्ये जिथे रक्तरंजित थरार, तिथेच आता...; सुरक्षा दलांकडून हायअलर्ट

Baisaran One Person Arrested : पहलगाम हल्ल्यानंतर साऱ्या देशवासियांमध्ये संतापाचं वातावरण असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस पुढील तपास करत आहेत.

Prashant Patil

श्रीनगर : पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटत आहेत. भारत-पाक युद्धाचे ढग आता गडद होत आहे. अशातच आता पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी काल सोमवारी बैसरन खोऱ्यात फिरणाऱ्या एका संशयास्पद व्यक्तीला बुलेटप्रूफ जॅकेट कव्हरसह अटक केली आहे. बैसरन खोऱ्यात सुरु असलेल्या शोध मोहिमेदरम्यान त्याला अटक करण्यात आली. ही तीच जागा आहे जिथे २२ एप्रिलला रक्तपात झाला होता.

या संशयिताची अहमद बिलाल म्हणून ओळख पटवण्यात आली आहे. जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातलं होतं. सुरक्षा दलांनी त्याला चौकशीचा भाग म्हणून प्रश्न विचारले असता, बिलालने उडवाउडवीची उत्तर दिली. पहलगाम हल्ल्यानंतर साऱ्या देशवासियांमध्ये संतापाचं वातावरण असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस पुढील तपास करत आहेत.

या संशयिताने मात्र बुलेटप्रूफ जॅकेट कुठून मिळवलं हे स्पष्ट झालेलं नाहीय. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. याचप्रमाणे आज सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर देखील एका २६ वर्षीय पाकिस्तानी घुसखोराला अटक करण्यात आली आहे. या कारवाईंमुळे दहशतवाद्यांचे धाबे दणाणणार हे मात्र स्पष्ट आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, अटकेच्या वेळी घुसखोराकडे कोणतेही गुन्हेगारी साहित्य मिळालेलं नाही. एशिया न्यूज ऑब्झर्व्हरच्या वृत्तानुसार, सुरक्षा दलांकडून संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. सध्या त्याच्या मानसिक स्थितीचं मूल्यांकन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosquito Agarbatti: अगरबत्ती की विषारी धूर? डासांना पळवणारी अगरबत्ती ठरतेय कुटुंबासाठी जीवघेणी; घरात वापरण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात

आपवर ईडीची नजर! राज्यसभा खासदारावर मोठी कारवाई, निवासस्थानासह ८ ठिकाणी EDची छापेमारी

प्रेमसंबंधातून थरकाप उडवणारा खून! तरुणीला विष देऊन संपवलं अन्…

Maharashtra News Live Update: आरोपी अशोक खरातचं घर तोडलं गेलं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची मागणी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ₹६९,००० होणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT