haryana and jammu and kashmir Election Result 2024 News : Saam tv
देश विदेश

Election Result 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोणाची सत्ता येणार? कधी आणि कुठं पाहणार निकाल? वाचा

Vishal Gangurde

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १ ऑक्टोबर रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. तर याआधी १८ सप्टेंबर रोजी पहिलं आणि २५ सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभेसाठी निवडणूक झाली. हरियाणामध्येही ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक पार पडली.

काँग्रेसची सीपीएमसोबत हातमिळवणी

हरियाणात काँग्रेसने सीपीएमसोबत हातमिळवणी करून ९० जागांसाठी निवडणूक लढवली. एक जागा सीपीएमला दिली होती. तर हरियाणात भाजपने ८९ जागांवर निवडणूक लढवली होती. या व्यतिरिक्त अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही ९० जागांवर निवडणूक लढवली होती.

आठ वाजता मतमोजणीला सुरुवात

अधिकृत रिपोर्टनुसार, दोन्ही राज्यातील मतमोजणी ८ वाजता सुरु होणार आहे. त्याआधी निवडणूक अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे एजंट मतदान केंद्रावर उपस्थित असतील. निवडणूक अधिकारी सकाळी ६ वाजता मतमोजणी टेबलावर उपस्थित असतील.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची निकाल तुम्ही साम टीव्ही, साम टीव्हीच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता. या दोन्ही राज्याचे निकाल साम टीव्हीची वेबसाईट आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पाहू शकता.

एक्झिट पोलमधील अंदाज काय?

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा (Haryana) विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल ६ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. या एक्झिट पोलमध्ये हरियाणात भाजप सत्ता गमावत असल्याचे दिसत आहे. तर काँग्रेस जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फेरन्स-काँग्रेस युती आघाडीवर दिसत आहे.

सी-वोटरच्या सर्व्हेनुसार, हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला किमान २०-२८ जागा मिळू शकतात. त्यांच्या सर्व्हेनुसार, काँग्रेस पक्ष सत्तेत विराजमान होताना दिसत आहे. काँग्रेसला हरियाणाला ५०-५८ जागा मिळत असल्याचे दिसत आहे. तर जेजेपीला ०-२ जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अन्य पक्षांना १०-१४ जागा दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: पंखा थांबवून लड्डू मुत्त्या बाबाचा भक्तांना आशीर्वाद? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

Harshvardhan Patil News : हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकली, भरणेंचं टेंशन वाढलं; आमदार झाले तर पाटलांचं मंत्रिपद पक्क? VIDEO

Prashant Paricharak: देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी, प्रशांत परिचारक तुतारी फुंकणार?

Rohit Sharma: रोहित कसोटी क्रिकेटला रामराम करणार? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा

Maharashtra Politics : मंत्रालयातील मेगाभरतीची घोषणा हवेतच; किती कर्मचाऱ्यांची आहे कमतरता? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT