Jammu Kashmir: 135 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत; BSF अ‍ॅलर्ट मोडवर Saam TV
देश विदेश

Jammu Kashmir: 135 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत; BSF अ‍ॅलर्ट मोडवर

या दरम्यान आता देशावर देखील दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती या कायम सुरु आहेत. या दरम्यान आता देशावर देखील दहशतवादी (Terrorist) हल्ल्याचे सावट असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणेने पाकिस्तानच्या (Pakistan) सीमेवर दहशतवादी सक्रीय बनले आहे. त्यांच्याकडून घुसखोरी करून हल्ला घडवला जाण्याची शक्यता वर्तवली आहे. BSF सह सर्व सुरक्षा दलांनी याची आता गंभीर दखल घेतली आहे. नियंत्रण रेषेवर (एलओसी) जवळपास १०४ ते १३५ दहशतवादी दबा धरून बसले आहेत. ते काश्मीरमध्ये (Kashmir) घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महानिरीक्षक राजा बाबू सिंह यांनी काल याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. (Jammu Kashmir 135 terrorists preparing infiltrate)

हे देखील पहा-

दहशतवाद्यांची घुसखोरी उधळून लावण्याकरिता बीएसएफ अ‍लर्ट (Alert) मोडवर आहे. मागील वर्षी हिंदुस्थान- पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करार झाला आहे. या करारावर एलओसीवर शांतता आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १०४ ते १३५ दहशतवादी कश्मिरात घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत. ते सध्या पाकिस्तानी सैन्याने तयार केलेल्या लॉन्च पॅडवर दबा धरून आहेत. बीएसएफकडून त्या दहशतवाद्यांच्या हालचाली आणि इतर कारवायांवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. २०२१ मध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्याच्या अनेक घटना या समोर आले आहे. जवळपास ५८ घटना समोर आले आहेत.

त्यामध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. २१ जण पळून गेले होते. तर एकाने आत्मसमर्पण देखील केले आहे. २०२१ मध्ये घुसखोरीच्या ३१, २०१९ मध्ये १३०, २०२० मध्ये ३६ घटना समोर आले आहेत. तसेच २०२१ मध्ये बीएसएफने विविध घटनांमध्ये ३ एके ४७ रायफल, ६ पिस्तूल, २ आयईडी आणि १७.३ किलो हिरोईनबरोबरच अनेक गोष्टी जप्त केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. प्रजासत्ताक दिन जवळ आले असल्याने मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याविषयी संभाषण झाल्याचे तपास यंत्रणांना कळल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. (Jammu Kashmir 135 terrorists preparing infiltrate)

मुंबईबरोबरच महाराष्ट्रात ड्रोनने हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यभरामध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस (Police) यंत्रणा सतर्क झाली आहे. धक्कादायक म्हणजे ड्रोनच्या मदतीतून हा हल्ला होण्याची भीती वर्तवली जात आहे. याविषयी केंद्रीय तपास यंत्रणेने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. डार्क नेटवरुन दहशतवाद्यांचे संभाषण झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे ड्रोनद्वारे (drone) हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जम्मू- काश्मीर आणि पंजाबमध्ये (Punjab) ड्रोन हल्ल्याची शक्यता केंद्रीय तपास यंत्रणेने दिली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाचे (cyber department) आयजी यशस्वी यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT