वृत्तसंस्था: केंद्र सरकारने आयात शुल्कामध्ये कपात केल्यामुळे तेलाच्या भावात घट झाली होती. पण आता नियंत्रणातील तेल भाव परत एकदा महागण्याची चिन्हे आहेत. प्रामुख्याने आयात महागल्याने तेलभाव वाढीची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत मुंबईमध्ये खाद्यतेलाचा (edible oil) सरासरी भाव १२५ ते १३५ रुपये प्रति लिटर होता. यानंतर कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे आयातीत (Import) घसरण झाली. परिणामी मे- जूनदरम्यान सरासरी भाव १७०- १८० रुपये प्रति लिटरच्या घरात गेला. (Edible oil will go up again)
हे देखील पहा-
त्यानंतर आयात शुल्ककपातीमुळे सरासरी दर १५० ते १६० रुपयांवर आले होते. त्यानंतर हे दर १२५ ते १४० रुपये प्रति लिटरवर स्थिरावले आहेत. पण आता या भावात (Rate) परत एकदा वाढीची शक्यता आहे. अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार की, देशभरात एकूण खाद्यतेल मागणीमध्ये ६५ टक्के तेल पामतेल असते. हे तेल आयात करावे लागते. ६० टक्के आयात मुंबईच्या बंदरावर होते. केंद्राने आयात शुल्क कमी केले असले तरी आता आयातीमध्ये तेलाचे भाव वधारलेले आहेत.
यामुळे येत्या काळात खाद्यतेल महागण्याची चिन्हे आहेत. ही दरवाढ टाळण्याकरिता खाद्यतेलावर ५ टक्के जीएसटी केंद्राने रद्द करायला हवा. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. सर्व प्रकारचे धान्य जीएसटीमुक्त असताना केवळ खाद्यतेलावर जीएसटी आहे. यामुळेच खाद्यतेल महाग असल्याचे व्यापाऱ्यांचे सांगणे आहे. भारत हा खाद्यतेलाची सर्वाधिक मागणी असलेला देश आहे.
भारतात एकूण मागणीच्या जवळपास ७५ टक्के तेल हे शुद्ध, तेलबिया किंवा कच्च्या तेलाच्या रूपात आयात केले जाते. त्यामध्ये पामतेल ५५ टक्के, सोयाबीन (Soybean) १५ टक्के व सूर्यफुल तेलाची ५ टक्के आयात होते. एकूण मागणीच्या सुमारे १५ ते १८ टक्के मागणी मुंबईमध्ये असते.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.