J&K Saam
देश विदेश

Jammu Kashmir: जम्मू -काश्मीरमध्ये ढगफुटी! महामार्ग बंद, रस्ते खचले; मुसळधार पावसामुळे ३ जणांचा मृत्यू

Ramban Cloudburst Death Toll Rises to 3 Rescue Efforts Continue: जम्मू आणि काश्मीरमध्ये रविवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे रामबन जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

Bhagyashree Kamble

जम्मू आणि काश्मीरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे जम्मू - काश्मीरच्या रामबनमध्ये पूर आला असून, यात ४० घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू असून, यातून १०० नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

उधमपूरचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. ज्यात त्यांनी नागरिकांना धीर दिला आहे. "काल रात्री रामबन परिसरात अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. जोरदार पावसामुळे भूस्खलन झाले आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. यातून १०० जणांना वाचवण्यात आले आहे. मात्र, तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ४० हून अधिक कुटुंबाचे नुकसान झाले असून, बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू आहे".

तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, "पीडित कुटुंबाना सर्व प्रकारची मदत दिली जात आहे. मग ती आर्थिक असो किंवा इतर कोणतीही मदत दिले जाईल. गरज पडल्यास खासदार निधीतून वैयक्तिक मदत देखील दिली जाईल. नागरिकांनी न घाबरता संयमाने या आपत्तीला सामोरे जाणं गरजेचं आहे. आपण एकत्रितपणे या आपत्तीवर मात करू", असं जितेंद्र सिंह म्हणाल्या.

रविवारी जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका धर्म कुंड या गावाला बसला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, १०० हून अधिक गावकऱ्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. पावसाने विश्रांती न घेतल्यामुळे अनेक मार्गावर भूस्खलन झाले आहे. ज्यामुळे अनेक मार्गांचे वाहतूक बंद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे बंधूंचं 'अब ती बार ७५ पार', ठाणे महापालिकेसाठी रणशिंग फुंकले, बड्या खासदाराने दिले संकेत

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

SCROLL FOR NEXT