Budgam Bus Accident Video Saam tv
देश विदेश

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Budgam Bus Accident update : काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना घडली आहे. काश्मीरच्या बडगाममध्ये BSF जवानांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

Budgam Bus Accident :

काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भीषण दुर्घटना घडली आहे. काश्मीरच्या बडगाममध्ये शुक्रवारी बीएसफ जवानांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये ३६ जवान होते. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २८ जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरच्या बडगामजवळील ब्रिल गावाजवळ चालकाने बसवरील नियंत्रण गमावलं. रस्त्यात चालकाने बस नियंत्रणात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्यात बस चालक अयशस्वी ठरला. ही अनियंत्रित बस पुढे जाऊन दरीत कोसळली.

स्थानिक मदतीला धावले

बीएसएफ जवानांची बस खोल गदरीत कोसळल्यानंतर थेट दगडांवर आदळली. बस दरीत दगडांवर आदळल्यानंतर मोठा आवाज आला. त्यानंतर बसचा आवाज आल्यानंतर आजूबाजूचे स्थानिक लोक मदतीला धावले. त्यांनी तातडीने जखमी बीएसफ जवानांची मदत सुरु केली. या भीषण अपघातात बीएसएफचे जवान गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी पोहोचले. पोलिसांनी जवानांना बसमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली.

पोलीस आणि सैन्य दलाच्या जवानांकडून मदत कार्य सुरु

या काही माध्यमांनी या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तर एएनआय वृत्त संस्थेने या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या भीषण अपघातात २८ जण जखमी झाले आहेत. या जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस आणि सैन्य दलाच्या जवानांनी मदत कार्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. यामुळे तपास यंत्रणा या बाजूनेही तपास करत आहे.

राजौरी घडली होती भीषण दुर्घटना

दरम्यान, राजौरी येथेही मंगळवारी रात्री सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळलं होतं. या घटनेत ४ जवान जखमी झाले होते. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी ४ जखमी जवानांना रुग्णालयात नेलं. या घटनेत लांस नायक बलजीत यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने त्यांच्यावर गावावर शोककळा पसरली होती. एका वर्षाआधीच त्यांचं लग्न झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT