
सचिन जाधव
Pune Accident News : पुण्यातून अपघाताचं मोठं वृत्त येत आहे. पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. टँकरने २४ वाहनांना उडविल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नर्हेजवळील दरी पुल येथे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३० वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. कटेंनरने धडक दिल्याने वाहनं एकमेकांवर धडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातात ४५ ते ६० जण जखमी झाले आहेत.
पुण्यातील या भीषण अपघातात अग्निशमन दलाच्या २ रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवानांकडून बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.
दरम्यान, पुण्यातील या भीषण अपघाताबाबत पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी माहिती दिली आहे. 'सदर अपघात ब्रेक फेल्याने झाला आहे. या अपघातात २४ वाहनांचा अपघात झाल्याची माहिती हाती आली आहे. या अपघातामुळे काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत'.
'या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यावर ऑइल सांडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. थोड्या वेळात वाहतूक सुरू करू. अपघाताचे कारण शोधले जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.