BJP Announced 11th Candidate List: Only One Candidate Selected From Bhadohi Loksabha Constituency Saam Tv
देश विदेश

BJP Candidate List: उमेदवारीवरुन भाजपमध्ये सावळा गोंधळ! आधी यादी जाहीर, नंतर स्थगिती; जम्मू- काश्मीर विधानसभेसाठी १५ नावांची घोषणा

Jammu And Kashmir Assembly Election 2024: जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून आज १५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. तत्पुर्वी उमेदवारीवरुन भाजपमध्ये सावळा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. २६ ऑगस्ट २०२४

जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून आज १५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. तत्पुर्वी उमेदवारीवरुन भाजपमध्ये सावळा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपने आधी तिन्ही टप्प्यासाठी 44 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र ही यादी तात्काळ स्थगित करण्यात आली आणि त्यानंतर नव्याने १५ नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपचे १५ उमेदवार ठरले

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ही यादी पहिल्या टप्प्यासाठीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपने 8 मुस्लिम चेहऱ्यांना संधी दिली आहे. यापूर्वी भारतीय जनता पक्षाने 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, मात्र ती यादी तात्काळ मागे घेण्यात आली. या यादीत 14 मुस्लिम उमेदवार होते.

तीन टप्प्यात होणार निवडणुका

जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 मध्ये येथे शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. जम्मू-काश्मिरमधील विधानसभेच्या ९० जागांसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर असे तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

पहिल्या टप्प्यात 'या' जागांवर मतदान

पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे त्यात पंपोर, त्राल, पुलवामा, राजपोरा, जैनापोरा, शोपियान, डी.एच. पोरा, कुलगाम, देवसर, डोरू, कोकरनाग (एसटी), अनंतनाग पश्चिम, अनंतनाग, श्रीगुफवारा, बिजबेहारा, शांगस-अनंतनाग पूर्व, पहलगाम, इंदरवाल, किश्तवाड, पाडेर, नागसेनी, भदरवाह, डोडा, दोडा पश्चिम, रामबन आणि बानी यांचा समावेश आहे.

८ मुस्लिम नेत्यांना संधी

भाजपच्या 15 उमेदवारांच्या नव्या यादीत 8 मुस्लिम उमेदवारांनाही तिकीट देण्यात आले आहे. ज्या जागांवर हे मुस्लिम उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्या बहुतांश काश्मीर खोऱ्यातील आहेत. अभियंता सय्यद शौकत मयूर अंद्राबी, अर्शीद भट्ट, जावेद अहमद कादरी, मोहम्मद रफिक वाणी, अधिवक्ता सय्यद वजाहत, सोफी युसूफ, तारिक कीन आणि सलीम भट्ट यांना वेगवेगळ्या जागांवर तिकीट देण्यात आले आहे.

पहिली यादी रद्द का झाली?

दरम्यान, भाजपने जाहीर झालेल्या पहिल्या यादीत ४४ उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये 14 मुस्लिम उमेदवारांचाही समावेश होता. मात्र, या यादीतील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे निर्मल सिंग आणि कविंदर गुप्ता या दोन माजी उपमुख्यमंत्र्यांची नावे त्यात नव्हती. या दोघांची तिकिटे रद्द करण्यात आली. जम्मूच्या गांधीनगर मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांचे तिकीट रद्द करण्यात आले होते. तसेच निर्मल सिंह यांनाही जम्मूच्या बिलवार मतदारसंघातून तिकीट देण्यात आले नव्हते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT